महाराष्ट्र हादरला! अनैतिक संबंधाच्या संशयातून गरोदर तरुणीसह बहिणीची हत्या, रक्ताच्या थारोळ्यात सापडली आई

महाराष्ट्र हादरला! अनैतिक संबंधाच्या संशयातून गरोदर तरुणीसह बहिणीची हत्या, रक्ताच्या थारोळ्यात सापडली आई

या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी दादाराव म्हैसागर याने तिघांना जीवे मारले असल्याची कबुली दिली असून 2 मुलींचा शोध पोलीस घेत आहेत.

  • Share this:

बुलडाणा, 15 ऑक्टोबर: रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह आढळल्यानं बुलडाणा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. शेतात महिलेचा मृतदेह पाहून स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन या महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आणि चौकशीदरम्यान धक्कादायक बाब समोर आली आहे.

अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणानं आईसह दोन मुलींची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. ही धक्कादायक घटना बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात येणाऱ्या ग्राम पिंपळखुटा परिसरात घडली आहे.

हे वाचा-नागपुरात हत्येचा थरार! पैशांवरून झाला वाद, गुंडाचा गळा चिरुन केला खून

ग्रामस्थ आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनैतिक संबंधाच्या संशयातून आई-दोन महिलांची हत्या करण्यात आली. आईवर धारदार शस्रानं वार केल्यानं रक्ताच्या थारोळ्यात शेतात हा मृतदेह आढळला आहे. तर दोन्ही मुलींचा मृतदेह अद्याप सापडला नाही. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. त्यापैकी एक मुलगी 5 महिन्यांची गर्भवती होती.

या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी दादाराव म्हैसागर याने तिघांना जीवे मारले असल्याची कबुली दिली असून 2 मुलींचा शोध पोलीस घेत आहेत. ह्या दोन्ही मुलींना आरोपीने विहिरीत ढकलून मारले असल्याची कबुली दिली असली तरी अद्याप त्यांचा मृतदेह पोलिसांना मिळाला नाही. त्यामुळे पोलीस पथकाकडून तपास सुरू आहे. आरोपी विरोधात बोरखेडी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास बोरखेडी पोलिस करीत आहेत.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 15, 2020, 11:26 AM IST

ताज्या बातम्या