मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

VIDEO : बुलढाण्यात दुचाकी आणि रिक्षाचा भयानक अपघात, सीसीटीव्हीत काळीज पिळवटून टाकणारी दृश्य कैद

VIDEO : बुलढाण्यात दुचाकी आणि रिक्षाचा भयानक अपघात, सीसीटीव्हीत काळीज पिळवटून टाकणारी दृश्य कैद

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव-वाडी या रस्त्यावर एक भीषण अपघात झाला. रिक्षा आणि दुचाकी यांच्यात हा भयानक अपघात झाला.

    राहुल खंदारे, बुलढाणा, 17 ऑगस्ट : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव-वाडी या रस्त्यावर एक भीषण अपघात झाला. रिक्षा आणि दुचाकी यांच्यात हा भयानक अपघात झाला. दुचाकीस्वार दोघे मागून भरधाव येऊन त्यांनी ऑटोला धडक दिली. त्यामध्ये 2 जण जखमी झाले. दोन वाहनातील धडक इतकी जोरदार होती की रिक्षा चक्क विरुद्ध दिशेने फिरली. या अपघाताची थरारक दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अतिशय अचूकपणे कैद झाले आहेत. दीपाली नगर खामगाव जवळ हा भीषण अपघात झाला. अपघाताची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. ते दृश्य पाहून अनेकांच्या अंगावर काटा येईल, असे ते दृश्य आहेत. अपघातात जखमी झालेल्यांना उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. (मुंबई-दहिसर प्रवास ठरला अखेरचा, खड्डा पाहून ब्रेक मारताच डंपरची धडक, नंतर चिरडलं, भयानक घटना) संबंधित घटनेचा सीसीटीव्ही फुटेज हा व्हायरल देखील झाला आहे. रस्ता नेहमीप्रमाणे सुरु असतात. रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. सर्वसामान्यपणे वर्दळ होती. या दरम्यान रिक्षा समोरच्या दिशेतून येत होती. पण रिक्षा चालकाने मागेपुढे फार गाड्या नसल्याने यु टर्न मारला. नेमकं त्याचवेळी भरधाव वेगात दुचाकी आली. ही दुचाकी जोरात रिक्षाला धडकली आणि दुचाकीवरील दोघेजण खाली पडले. अतिशय थरारक असा हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की रिक्षा थेट विरुद्ध दिशेला फिरली. अपघाताच्या घटनेनंतर तातडीने परिसरातील नागरिकांनी जखमींना रुग्णालयात नेले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाची देखील पाहणी केली. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: Accident, Bike accident

    पुढील बातम्या