Home /News /crime /

पाशवी शिक्षक; 8 वीतील विद्यार्थिनीसोबत केलेलं कृत्य पाहून न्यायाशीधही हादरले; सुनावली 10 वर्षांची शिक्षा

पाशवी शिक्षक; 8 वीतील विद्यार्थिनीसोबत केलेलं कृत्य पाहून न्यायाशीधही हादरले; सुनावली 10 वर्षांची शिक्षा

शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील संबंध हे पवित्र नात्यांसारखं असतं. मात्र या शिक्षकाने विद्यार्थिनीच्या रक्ताचे घोट घेतले.

    वॉशिंग्टन, 16 जुलै: शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील संबंध हे पवित्र नात्यांसारखं असतं. मात्र अमेरिकेच्या (US) टेक्सास (Texas) मध्ये या नात्याला काळीमा फासला आहे. येथे एका शिक्षिकेने 8 वीच्या वर्गातील विद्यार्थिनीचं शोषण केलं आणि त्यानंतर त्याने केलेलं कृत्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. शिक्षकाने इंजेक्शन घेऊन तिच्या शरीरातील रक्त (Teacher Sought To Drink Student's Blood) काढण्याचा प्रयत्न केला. 8 वीच्या वर्गातील विद्यार्थिनीला पाठवले अश्लील ई-मेल न्युयॉर्क पोस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, आरोपी शिक्षक मार्क एलिसन याने 8 वीच्या वर्गातील विद्यार्थिनीला अश्लील ई-मेल पाठवले होते. या शिक्षकाने विद्यार्थिनीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता आणि तिला सेक्स टॉयदेखील आणून दिला होता. कोर्टाने (Court) आरोपी शिक्षक मार्कला दोषी घोषित करीत 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. मार्क, रॉकवालमधील केन मिडिल शाळेत ऑर्केस्ट्रा शिक्षक होता. मुलीला शिकवताना त्याने चुकीच्या पद्धतीने फायदा घेतला होता. (brutal teacher The judge was shocked to see what he had done to the 8th grader Sentenced to 10 years ) हे ही वाचा-धक्कादायक! फिल्ममेकिंगच्या आडून देह विक्रय रॅकेट; निर्माता असा करायचा सप्लाय शिक्षा देण्यापूर्वी न्यायाधीश काय म्हणाले? निकाला सुनावणी करण्यापूर्वी न्यायाधीशांनी सांगितलं की, आई-वडिलांना आपल्या मुलांसोबत वेळ घालवायला हवा. त्यांच्यासोबत कोण कसं वागतं, त्याबद्दल सतत विचारत राहायला हवं. मुलांना गुड टच आणि बॅड टचविषयी सांगायला हवं. ते पुढे म्हणाले की, शिक्षक मार्कने आपल्या पदाचा फायदा घेत धक्कादायक कृत्य केलं. त्याने शिक्षकांवरील पालकांचा असलेला विश्वास तोडला आहे. पीडितेने तिच्यासोबत झालेला प्रकार पालकांना सांगून मोठं काम केलं आहे. कारण अनेकदा पीडित त्यांच्यासोबत घडलेला प्रकार कोणालाही सांगत नाही.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: America, Crime news, School teacher, Teacher

    पुढील बातम्या