अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची निर्घृण हत्या; असा काढला काटा

अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची निर्घृण हत्या; असा काढला काटा

Murder In Solapur: अनैतिक संबंधातून (Immoral Relationship) झालेल्या हत्येनं आज सोलापूर हादरलं आहे. एका प्रियकराने आपल्या अनैतिक संबंधात बाधा ठरणाऱ्या प्रियसीच्या पतीची निर्घृणपणे (Man murders lovers husband ) हत्या केली आहे.

  • Share this:

सोलापूर, 10 मार्च : अनैतिक संबंधातून (Immoral Relationship) झालेल्या हत्येनं आज सोलापूर हादरलं आहे. एका प्रियकराने आपल्या अनैतिक संबंधात बाधा ठरणाऱ्या प्रेयसीच्या पतीची निर्घृणपणे (Man murders lovers husband ) हत्या केली आहे. या दुर्दैवी घटनेतील मृत व्यक्तीचं नाव सलीम राज अहमद शेख असं असून त्याची कट रचून हत्या (Murder) करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने पावलं उचलत आरोपी नबीलाल रजाक शेखच्या मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत सलीम आणि त्याची पत्नी हे दोघंही सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत हमालीचं काम करत होते. यावेळी सलीमच्या पत्नीची ओळख शेळगी परिसरात राहणाऱ्या नबीलाल शेख याच्याशी झाली. यानंतर या दोघांच्या ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं आणि अनैतिक संबंधाला सुरुवात झाली. पण यांचे अनैतिक संबंध फार काळ लपून राहू शकले नाहीत. याच्या दोघाच्या प्रेमप्रकरणाची माहिती सासू आणि पतीला कळाली.

हे ही वाचा - 'मी प्रेग्नंट आहे...', गर्लफ्रेंडने GOOD NEWS दिल्यानंतर बॉयफ्रेंडनं चिरला तिचा

पण पतिने आणि सासूने सुनेची समजूत घालून तिला माफ केलं. ही बाब आरोपी प्रियकर नबीलाल शेख याच्या पचनी पडली नाही. त्यामुळे संतापलेल्या नबीलालने अनैतिक संबंधात बाधा ठरणाऱ्या पतिचा काटा काढण्याचा कट रचला. त्यानंतर आरोपीने विवाहित प्रेयसीच्या पतीला बहाणा करून बाहेर घेवून गेला आणि त्याची धारदार शस्त्राने हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी पोलिसांनी या हत्येचं गुढं उलगडलं असून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

हे ही वाचा-संपत्तीसाठी सुनेने सासूच्या हत्येचा रचला कट; दगडाने ठेचून केली हत्या

नेमकी हत्या कशी झाली?

सलीम आणि त्याची पत्नी दोघंही 9 मार्च रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीत काम करून दुपारी घरी परतले होते. त्यानंतर आरोपी प्रियकर सायंकाळी चारच्या सुमारास नबीलाल शेख त्यांच्या घरी आला. आरोपीने सलीमला गाडीवर बसवून दहिटणे परिसरातील घोडेपीर दर्ग्याजवळ घेऊन गेला. तेथिल एका वडाच्या झाडाखाली बसून दोघांनी मद्य प्राशन केलं. यानंतर सलीमला दारूची नशा झाल्याचं पाहून आरोपी नबीलाल शेख याने पती सलीम शेख याच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात सलीम रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही तासातचं आरोपी नबीलालच्या मुसक्या आवळल्या असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत..

Published by: Meenal Gangurde
First published: March 10, 2021, 11:19 PM IST

ताज्या बातम्या