नाशिक, 16 नोव्हेंबर : नाशिकमधील (Nashik) देवळाली गाव (Deolali village)परिसरात एका तरुणाची कोयत्याने सपासप वार करून हत्या करण्यात आल्याची अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ (CCTV Video) समोर आला आहे.
नाशिक रोड देवळाली दर्गा जवळील खोडदे चौकात रविवारी रात्री ही घटना घडली. योगेश चायल (yogesh chyal) असं मृत तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खोडदे चौकात राहणारे स्थानिक लोकं आणि काही मुलं हे रस्त्यावर फटाके फोडत होती. योगेश चायल सुद्धा आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत होता. त्यावेळी एका रिक्षातून 4 ते 5 तरुण कोयता, तीक्ष्ण हत्यार घेऊन आली आणि त्याच्यावर हल्ला केला.
जीव वाचवण्यासाठी योगेशने घराकडे पळाला पण वाटतेच तो पडला, पाठलाग करत आलेल्या या 4 ते 5 तरुणांनी योगेशवर कोयत्याने सपासप वार केले. यात योगेश जागेवर कोसळला.
जखमी अवस्थेत योगेशला जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हल्ला करणाऱ्या तरुणांमध्ये एकाकडे पिस्तुलही असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.
नागपुरात 2 तरुणांची हत्या
दरम्यान, नागपूरमध्ये दोन युवकाची पाचगाव कुही रोड येथील डोंगरगावाजवळ हत्या करून मृतदेह फेकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कुणाल ठाकरे (राहणार, नरसाला) आणि सुशील बावने (राऊत नगर, दिघोरी) अशी मृतांची नावं आहे. या दोन्ही तरुणांची हत्या करून मृतदेह नागपूर ग्रामीण हद्दित फेकलेले असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही मृतक तरुण नागपूर शहरातील राहणार आहे. आरोपी फरार असून पोलीस अधिक तपास करीत आहे.