Home /News /crime /

बापाच्याच चारित्र्यावर संशय, मुलाने तलवारीने वार करून आधी संपवले नंतर जाळला मृतदेह

बापाच्याच चारित्र्यावर संशय, मुलाने तलवारीने वार करून आधी संपवले नंतर जाळला मृतदेह

चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार करून निर्घृणपणे हत्या केली आणि मृतदेह वाहनासह जाळण्यात आला होता.

सोलापूर, 29 जुलै : सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या शिराळा येथील संजय काळे खून प्रकरणाचे गूढ उकलण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. या प्रकरणी तपासामध्ये धक्कादायक गोष्ट समोर आली असून फिर्यादी मुलगाच मारेकरी असल्याचे निष्पन्न झाले आहे. 20 वर्षांच्या मुलाने आपल्या अन्य दोन साथीदारांच्या मदतीने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. टेंभुर्णी पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे. संजय काळे यांचा मुलगा आकाश संजय काळे(वय20, राहणार शिराळा) लक्ष्मण बनपट्टे, आलम बासू मुलानी( दोघेही राहणार,सुरली तालुका माढा) केलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील लक्ष्मण बनपट्टे  सराईत गुन्हेगार असून त्याला खुनात साह्य करण्यासाठी सात हजारांची सुपारी देण्यात आली होती. पुण्यातील तरुणीच्या हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण, पोलिसांनी मारेकऱ्याला पकडलं संजय काळे यांचा सावकारीचा व्यवसाय होता. तसंच ते बेकरी उत्पादने विकत होते. आरोपींपैकी अल्लादिन मुलानी आणि संजय काळे यांच्या पैशाची देवाणघेवाण यावरून वाद झाला होता तेव्हा मुलानी चिडून म्हणाला होता की, 'संजय काळेला नाय सोडणार नाही' हे त्यांचा मुलगा आकाश याने ऐकले  होते आणि याच संधीचा फायदा घेऊन मुलानी यांच्याशी त्याने संधान बांधले आणि खुनामध्ये त्यांची मदत घेतली. तिसरा आरोपी लक्ष्मण बनपट्टे हा सराईत गुन्हेगार होता व वडिलांच्या काटा काढण्यासाठी आकाशने त्याला साथ दिली.  त्या रात्री नेमकं काय घडलं? घरातील सर्वजण झोपले होते. त्यावेळी संजय काळे घराजवळ असलेल्या पत्र्याची शेडमधील कॉटवर झोपले होते, झोपेत असलेल्या संजय यांच्यावर तिघांनी तलवारीने वार करून त्यांना ठार मारले. घरातील कुलरचा आवाज वाढवून वार केल्याने घरातील लोकांना झालेली घटना लक्षात आली नाही. सिगरेट, तंबाखूचे सेवन करत असाल तर सावधान! कोरोनाच्या गंभीर लक्षणांचा धोका जास्त रविवारी (26 जुलै) शेवरे येथे उजनी कालव्याचा उजव्या बाजूचा रस्त्यालगत लोकांना एक वाहन पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत दिसून आलं होतं. काही नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यात अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेहही दिसला. हा मृतदेह संजय काळे यांचाच असल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं. शरीराचे छातीपासून थोडावरचा भाग शीर आणि एक हात शाबूत होता. उर्वरित शरीर पूर्णपणे जळून खाक झाले होते. चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार करून निर्घृणपणे हत्या केली आणि मृतदेह वाहनासह जाळण्यात आला होता. घरातील गादी गायब झाल्याने संशय बळावला? घरातील गायब झाल्याने पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांचा संशय बळावला त्यांनी आकाशला चौकशीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यामुळे त्याला अंत्यविधीसही जाता आले नव्हते. पहिल्यांदा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिले. परंतु, पोलीस खाक्या दाखवताच अन्य दोन साक्षीदारांच्या सहीत वडिलांचा खून केल्याचे कबूल केले. आरडाओरड करू नका आधी वैचारिक गुंता सोडवा', सेनेचा भाजपच्या अध्यक्षांवर पलटवार पोलिसांनी सध्या या प्रकरणात हत्या झालेला संजय काळे याचा मुलगा आणि या प्रकरणातील फिर्यादी आकाश काळे यांच्यासह त्याच्या दोन सहकाऱ्यांना अटक केली आहे. या प्रकरणात करमाळा पोलीस उपअधीक्षक प्रशांत हिरे यांनी संजय काळे याची माहिती गोळा करताना त्याचे चारित्र्य संशयास्पद वाटल्याने अधिक चौकशी करता त्याचा मुलगाच यात सामील असल्याचा संशय आल्यावर त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा उलघडा झाला.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Crime, Pandharpur, खून, पंढरपूर, माढा, हत्या

पुढील बातम्या