मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /टण टण वाजलं मटण का नाही शिजलं? नवऱ्याने बायकोचा चिरला गळा, पोरीनं पोलिसांना सगळं सांगितलं

टण टण वाजलं मटण का नाही शिजलं? नवऱ्याने बायकोचा चिरला गळा, पोरीनं पोलिसांना सगळं सांगितलं

नवऱ्याने मटण आणलं पण घरात अचानक दोघांमध्ये वाद झाला

नवऱ्याने मटण आणलं पण घरात अचानक दोघांमध्ये वाद झाला

पती पत्नीमध्ये जेवणातील मटनावरून झालेल्या भांडणात पत्नीचा खून करण्यात आला आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Uttar Pradesh, India

रणजीत सिंग (अलीगढ), 28 मार्च : उत्तर प्रदेशमधील रोरावार परिसरात निर्घृण हत्येची घटना उघडकीस आली आहे. पती पत्नीमध्ये जेवणातील मटनावरून झालेल्या भांडणात पत्नीचा खून करण्यात आला आहे. किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद विकोपाला गेल्याने ही घटना घडली आहे. दरम्यान मुलांच्यासमोर पत्नीला मारून पळून जाणाऱ्या वक्तीस पकडण्यात आले आहे. ही घटना अलीगढ जिल्ह्यात माबुदनगरमधील आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

आपल्या आईला मारून पळून जाणाऱ्या बापाविरोधात मुलांनी आरडाओरडा केल्याने घटनास्थळी असलेल्या अनेक लोकांनी आरोपीस पकडले आहे. प्रचंड गोंधळात पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पकडण्यात आले आहे. सगीर आणि त्याची पत्नी गुड्डो हे 3 मुलांसह राहतात. घरात मटण आणण्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला, यावरून चाकूने गळा कापून खून करण्यात आला आहे.

टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी आकांक्षानं 'या' अभिनेत्रीला केला होता मेसेज, विचारला होता 'हा' प्रश्न

यावेळी जवळ असलेल्या मुलीने ही घटना पाहिली होती. यावेळी ती मुलगी म्हणाली की, पप्पा आणि मम्मीमध्ये मांसावरून वाद झाला. वाद इतका वाढला की वडिलांनी आईची हत्या केली आणि घटनेनंतर घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न सुरू केला.

यावेळी आमचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. आजूबाजूच्या लोकांनी वडिलांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी पतीला अटक केले आहे. 

धक्कादायक!आकांक्षा दुबेनंतर आणखी एका अभिनेत्रीचा मृत्यू; संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह

या प्रकरणाची माहिती देताना एसपी सिटी कुलदीप गुणवत म्हणाले की, रोरावार भागातील महमूद नगर येथून आरोपी पतीला अटक आली आहे. यासोबतच मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालाच्या आधारे इतर बाबींचा तपास केला जाईल. सध्या गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

First published:
top videos

    Tags: Crime, Crime news, Local18