Home /News /crime /

'सनीचा गेम केला, जंगलातून फेकून दिले', नागपुरात गँगवॉरमधून भयंकर घटना

'सनीचा गेम केला, जंगलातून फेकून दिले', नागपुरात गँगवॉरमधून भयंकर घटना

शहरातील हुडकेश्वर भागात तीन गुन्हेगारांनी दुचाकीने युवकाचे अपहरण करुन त्याचा दगडाने ठेचून खून केला.

नागपूर, 15 जून : देशाची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये खून आणि हत्याचे सत्र सुरूच आहे.  शहरातील हुडकेश्वर भागात तीन गुन्हेगारांनी दुचाकीने युवकाचे अपहरण करुन त्याचा दगडाने ठेचून खून केला. ही थरारक घटना बेसाजवळ धुंडा मारुती परिसरात उघडकीस आली. सनी दामोदर जांगीड (वय 20) असे अपहरण करून हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर हा गुन्हा करणाऱ्यापैकी मोनू रायडर आणि ललित रेवतकर या दोघांची नावे उघड झाली आहेत. तिसऱ्या आरोपीचे नाव अद्याप पुढे आले नाही.  मोनू रायडर  हा कुख्यात गुंड असून वेगवेगळ्या गुन्ह्यात त्याच्यावर आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपू्वी मोनू रायडर आणि सनी या दोघांमध्ये वाद झाला होता. हेही वाचा -असे असता का राजकीय पुढारी? पुण्यात घडली अत्यंत लाजीरवाणी घटना VIDEO सनीची आईने शनिवारी दुपारी हुडकेश्वर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार, सनी एका अंत्ययात्रेत गेला होता, नंतर तो परतच आला नाही. आरोपी मोनू आणि ललित या दोघांनी दुपारच्या सुमारास सनीला फोन करून मानेवाड्यातील श्रीनगरमध्ये बोलवले होते. सनी तेथे पोहचताच आरोपी मोनू रायडरने आधीच आपल्या इतर दोन साथीदारांना तिथे बोलावून ठेवले होते. सनी तिथे येताच त्यांच्यात वाद झाला. मोनूने त्याला शिवीगाळ करून पोटाला चाकू लावला आणि जबरदस्तीने आपल्या दुचाकीवर बसवले. सनीला दुचाकीवर बसवून आरोपीनी सुसाट वेगाने त्याला हुडकेश्वरमधील जंगलात नेले. त्यानंतर शस्त्राने घाव घालून निर्घृण हत्या केली. सनीची हत्या करून आरोपींनी त्याच्या भावाला फोन केला. 'सनीचा गेम केला असून हुडकेश्वरच्या जंगलामध्ये त्याला फेकले', अशी माहिती आरोपीने नातेवाईकाला दिली. हेही वाचा -सुशांतच्या आत्महत्येचं कारण आर्थिक परिस्थिती नाही, बहिणीनं केला मोठा खुलासा मृत सनी आणि  मुख्य आरोपी मोनू रायडर हे दोघेही एकत्र गुन्हे करत होते. परंतु, काही दिवसांपूर्वी मोनू रायडरने आपल्या साथीदारांना घेऊन कुख्यात गुंड रोहित रामटेकच्या गँगमध्ये सहभागी झाला होता. तर सनी लकी तेलंगच्या गँगमध्ये सहभागी झाला होता. तेव्हापासून दोघांमध्ये वाद पेटला होता. नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवली. या प्रकरणी एका आरोपीने पोलिसांपुढे शरणागती पत्कारली आहे.  या आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू असल्याचेही हुडकेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकमल वाघमारे यांनी सांगितले.  संपादन- सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

Tags: Nagpur

पुढील बातम्या