पोलीस स्टेशनमध्येच भावाने केली बहिणीच्या नवऱ्याची हत्या

पोलीस स्टेशनमध्येच भावाने केली  बहिणीच्या नवऱ्याची  हत्या

पोलीस स्टेशनमध्येच त्याने बेसावध असलेल्या आकाशच्या मानेवर व गळ्यावर धारधार चाकूने वार केले.

  • Share this:

विजय देसाई, नालासोपारा 14 ऑक्टोंबर : बहिणीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या संशयावरून भावाने बहिणीच्या नवऱ्याची पोलीस स्टेशनमध्ये हत्या केल्याची धक्कादाय घटना घडलीय.  नालासोपारा पोलीस स्टेशनमध्येच ही घटना घडल्याने खळबळ उडालीय. आकाश सर्जेराव  कोळेकर या तरुणाची त्याच्या मेव्हण्याने धारदार चाकूने मानेवर सपासप वार करुन हत्या केली. या प्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाशची पत्नी कोमल (20)रा.धनंजय स्टॉप, सोपारा गाव हिने रविवारी  सकाळी राहत्या घरी साडीचा वापर करून गळफास घेऊन आत्महत्या केली केली होती.

VIDEO : लव लेटरच्या बदल्यात चपलेचा प्रसाद; भरचौकात रोमिओ धू-धू धुतला

याप्रकरणी नालासोपारा पोलीस स्टेशनमध्ये त्याला चौकशीसाठी आणले होते. या वेळी पोलीस स्टेशनमध्ये फारसा स्टाफ ड्युटीवर नव्हता. बहुतेक सर्वजण निवडणुकीच्या कामासाठी बाहेर होते. राठोड नावाचे कर्मचारी आकाश कोळेकर याचा जाबजबाब दुसऱ्या गुन्ह्यातील संदर्भात घेत होते. इतक्यात आकाशचा मेव्हणा रवींद्र उर्फ योगेश तिथे अचानक आला आणि आपल्या बहिणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या रागातून आकाश ला धडा शिकविण्यासाठी तयारी करूनच पोलीस ठाण्यात पोहचला.आणि त्याने बेसावध असलेल्या आकाशच्या मानेवर व गळ्यावर धारधार चाकूने वार केले.

संतापजनक...शिक्षकानेच केला अल्पवयीन विद्यार्थ्यीनीवर सामुहिक बलात्कार

रक्तबंबाळ झालेल्या आकाशने उपचारासाठी रुग्णालयात नेले असता त्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. कोमल कोळेकर ही 8 महिन्यांची गरोदर होती. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी नालासोपारा पोलिसांनी मेहुणा रवींद्र उर्फ योगेशला अटक केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 14, 2019, 11:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading