उल्हासनगर, 27 मे : उल्हासनगर (ullhasnagar ) शहरात एकामागून एक हत्या होत असल्याने शहर पूर्णपणे हादरलं आहे. सोमवारी 24 मे रोजी अवघे वीस रुपये देण्यास नकार दिल्याने एका तरुणाची हत्या करण्यात आली होती. या घटनेला दोन दिवस उलटत असतानाच आता पुन्हा एकदा शहरात घराच्या हक्काच्या वादातून एकाची हत्या करण्यात आली आहे. सख्या भावाने (Brother) आपल्या भावाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगर मध्ये समोर आला आहे. घराच्या वाटणीवरून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल कदम आणि संतोष कदम हे दोघे सख्खे भाऊ आहे. या दोघा भावांची आईज्या घरात राहत होत्या, त्या घराच्या वाटणी आणि हक्कावरून दोघा भावांमध्ये वाद होते. संतोष कदम हा वारंवार आपल्या आईच्या घरी जाऊन दारू पिऊन धिंगाणा घालायचा.
White fungus ने रुग्णाची आतडीच पोखरून काढली; पहिलंच भयंकर प्रकरण समोर
19 मे रोजी त्याने आपल्या आईला यावरूनच शिवीगाळ करीत धिंगाणा घातला. त्यावेळी आई जनाबाई यांनी विठ्ठल कदमला फोन करून घरी बोलावून घेतले. यावेळी दोघा भावांमध्ये वाद झाला. संतोष आपल्या आईच्या घरावर हक्क सांगत असताना हे माझ्या देखील आईचं घर आहे, असं विठ्ठलने त्याला सांगितलं.
मात्र थोड्या वेळाने 'विठ्ठल, तुला बघून घेईन' असं म्हणत आरोपी संतोष तेथून निघून गेला. याच दरम्यान बुधवारी रात्रीच्या सुमारास कॅम्प नंबर 1 च्या भिमनगर परिसरात विठ्ठल हा कामानिमित्त आला होता. याच वेळी जुन्या भांडणाचा राग मनात धरून संतोषने विठ्ठलच्या डोक्यात लोखंडी रॉडने जोरदार प्रहार करीत हल्ला केला. यात विठ्ठलाचा मृत्यू झाला.
दरम्यान, याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात संतोष कदम याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी संतोषाला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, केवळ घराच्या वाटणीवरून आपल्या सख्या भावाची भावनेच हत्या केल्याने दोन कुटुंब यात उद्ध्वस्त झाली आहेत. दरम्यान या हत्येमुळे उल्हासनगर शहरात खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime