सख्खा भाऊ पक्का वैरी! लग्नाच्या एक दिवस आधी बहिणीची केली निर्घृण हत्या

सख्खा भाऊ पक्का वैरी! लग्नाच्या एक दिवस आधी बहिणीची केली निर्घृण हत्या

त्याने आपल्या सख्या बहिणीची गोळी मारून हत्या (Murder) केली आहे.

  • Share this:

मेरठ, 23 जानेवारी: बहिण भावाच्या नात्याला कलंक लावणारी एक धक्कादायक घटना समोर आली. आपल्या बहिणीचं एका मुलाशी असलेलं प्रेमसंबंध (Love affair) भावाला (Brother) बघवलं नाही, त्यामुळे त्याने आपल्या सख्या बहिणीची (sister) गोळी मारून हत्या (Murder) केली आहे. मृत तरुणीचं लग्न (marriage) 24 जानेवारी रोजी होणार होतं. लग्नाला केवळ एक दिवस बाकी असताना, आरोपी भावानं आपल्या बहिणीला संपवलं आहे. त्यामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे.

सदर घटना उत्तर प्रदेशातील लिसाडीगेड पोलीस स्टेशन परिसरातील इस्लामनगर या गावातील आहे. याठिकाणी शनिवारी सकाळी ही धक्कादायक घटना घडली आहे. इस्लामनगर येथील 18 वर्षीय फिरदौसचं लग्न लिसाडीगेड क्षेत्रातीलच एका तरुणासोबत 24 जानेवारी रोजी होणार होतं. पण या मृत मुलीचं यापूर्वीच एका मुलासोबत प्रेमसंबंध सुरू होते. त्यामुळे मृत मुलीच्या प्रियकराने तिचे काही आक्षेपार्ह फोटो मुलीच्या सासरच्या लोकांना पाठवले. त्याने असे आक्षेपार्ह फोटो पाठवून लग्न मोडायचा प्रयत्न केला.

हे ही वाचा-डेटवर गेली होती तरुणी; रेस्टॉरंटमध्ये बॉयफ्रेंडच्या चश्म्यातून झाला खुलासा

लग्नाच्या एक दिवस आधी शनिवारी सकाळी भावाला संबंधित प्रकाराची माहिती मिळाली. त्यानंतर त्याने आपल्या बहिणीचे आक्षेपार्ह फोटो पाहिले आणि संतापाच्या भरात त्याने मित्राकडून कट्टा आणला आणि सख्या बहिणीची हत्या केली. हत्येनंतर पोलिसांनी आरोपी फिरोजला अटक केली आहे. पोलीस अधिकारी अरविंद चौरासिया यांनी सांगितलं की, मृत तरुणीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला असून घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील कारवाई करण्यात येत आहे. या सनसनाटी घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Published by: News18 Desk
First published: January 23, 2021, 9:18 PM IST

ताज्या बातम्या