धक्कादायक! भावोजींच्या जागी 5 वर्षे मेहुणा करत होता पोलीस ड्युटी, असा झाला उलगडा

धक्कादायक! भावोजींच्या जागी 5 वर्षे मेहुणा करत होता पोलीस ड्युटी, असा झाला उलगडा

पोलीस कॉन्स्टेबल (police constable) स्वता:च्या ऐवजी त्याच्या मेहुण्याला ड्युटीवर पाठवत असल्याचा अजब प्रकार घडल्यानं अनेकांना धक्का बसला. अनिल कुमार नावाच्या या व्यक्तीवर स्वत:च्या मेहुणा अनिल सोनी याला घरातच पोलीस प्रशिक्षण देऊन नोकरीसाठी पाठवण्याचा कट रचल्याचा आरोप आहे.

  • Share this:

मुरादाबाद, 18 जून : एका पोलीस कॉन्स्टेबलने आपल्या पदाचा गैरवापर केल्याचे प्रकरण समोर आलं आहे. संबंधित पोलीस कॉन्स्टेबल (police constable) स्वता:च्या ऐवजी त्याच्या मेहुण्याला 5 वर्षे ड्युटीवर पाठवत असल्याचा अजब प्रकार घडल्यानं अनेकांना धक्का बसला. अनिल कुमार नावाच्या या व्यक्तीवर स्वत:च्या मेहुणा अनिल सोनी याला घरातच पोलीस प्रशिक्षण देऊन नोकरीसाठी पाठवण्याचा कट रचल्याचा आरोप आहे.

काही अज्ञात व्यक्तींनी पोलिस अधिकाऱ्यांना याची माहिती दिली होती. ज्यानंतर गोपनीय चौकशीत संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं, सध्या पोलिसांनी खऱ्या भरती झालेल्या कॉन्स्टेबल अनिल कुमारला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे, तर बनावट अनिल कुमार उर्फ ​​अनिल सोनी फरार झाला आहे. हा सर्व प्रकार उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधील कोतवाली ठाकूर परिसरातील डायल 112 येथे तैनात कॉन्स्टेबल अनिल कुमार याच्याशी संबंधित आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमधील खतौली येथे राहणाऱ्या अनिल कुमारने 2011 मध्ये बरेली येथून पोलीस भरतीसाठी प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला. त्यानंतर अनिल कुमारने 2012 मध्ये मेरठमध्ये पोलीस भरतीसाठी प्रयत्न केले पण तेथेही तो अयशस्वी झाला. नोव्हेंबर 2012 मध्ये मात्र तिसऱ्या प्रयत्नात त्याला यश आलं. गोरखपूर येथे त्याची हवालदार म्हणून निवड झाली. प्रशिक्षण संपल्यानंतर पद आणि गोपनीयतेची शपथ घेऊन त्याची बरेली जिल्ह्यात पोस्टिंग मिळाल्यानंतर तो ड्युटीवर तैनात झाला. पुढे बरेली रेंजमधून त्याची मुरादाबादमध्ये बदली केली गेली, तेव्हा येथून त्यानं पदाचा गैरवापर करण्यास सुरुवात केली.

मुरादाबाद रेंजमध्ये बदली झाल्यानंतर या अनिल कुमारनं त्याच्या बदली आपल्या मेहुण्याला ड्युटीवर पाठवण्यास सुरुवात केली. त्यानं बदलीचा अर्ज घेऊन  मुरादाबाद पोलीस अधिकाऱ्यांसमोर मेहुण्याला पाठवले. तेथील अधिकाऱ्यांनीही फोटोची शहानिशा न करताच पुढील प्रक्रिया केली गेली. त्यामुळं अनिल कुमारच्या जागी अनिल सोनी काम करू लागला. अनिल कुमारनं मेव्हुण्याला घरातच सर्व प्रशिक्षण दिलं होतं. पोलिसांचे सर्व नियम, बंदूक कशी चालवायची, अधिकाऱ्यांना कसा सॅल्युट करायचा याचं ट्रेनिंग घरातच दिलं होतं.

हे वाचा - देशात पहिल्या मेडिकल ड्रोन डिलिव्हरीची चाचणी; कोरोनाविरोधी लढ्यात काय होणार फायदा?

मात्र, पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर या प्रकाराची पोलखोल करण्यात आली. अनिल कुमारला ताब्यात घेण्यात आलं असून त्याचा मेव्हुणा मात्र फरार झाला आहे. अनिल कुमारला खात्यात कोणी मदत केली होती, का याची तपासणी करण्यात येत असून अशाप्रकारे कोणी काम करत आहे का हे पाहिले जात आहे.

Published by: News18 Desk
First published: June 18, 2021, 6:22 PM IST

ताज्या बातम्या