पुण्यात ‘सैराट’ घडले, भावाने आणि वडिलांनी बहिणीच्या प्रियकराच्या डोक्यात घातला कोयता!

पुण्यात ‘सैराट’ घडले, भावाने आणि वडिलांनी बहिणीच्या प्रियकराच्या डोक्यात घातला कोयता!

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातील धानोरे इथं गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली.

  • Share this:

पुणे, 16 जानेवारी : राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात (Pune) 'सैराट'ची (Sairat) पुनरावृत्ती घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून भाऊ आणि वडिलांनी एका 25 वर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातील धानोरे इथं गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली. राजू गौतम भिसे (वय 25) असं हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.

आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा अन् भाजपकडून 'नमस्ते संभाजीनगर' बॅनरबाजी

राजू गौतम भिसे याचे आरोपींच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. याची कुणकुण मुलीच्या कुटुंबीयांना लागली होती. याच कारणावरून मुलीचा भाऊ प्रतिक ओव्हाळ याने गुरुवारी मध्यरात्री राजू भिसेचे घर गाठले आणि 'माझ्या बहिणीचा नाद सोडून दे', असा समाज दिला. पण, दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची उडाली. त्यानंतर प्रतिक आणि त्याच्या वडिलांनी मित्राच्या मदतीने राजू भिसेला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. एवढंच नाहीतर राजू भिसेच्या डोक्यात कोयत्याने वार करण्यात आला होता.

सावधान! तुम्हालाही हा मेसेज आलाय का? गृह मंत्रालयाकडून फसवणूकीबाबत अलर्ट जारी

मुलाला मारहाण होताना पाहून आई  सुनीता भिसे यांनी मदतीसाठी धाव घेतली असता आरोपींनी तिलाही मारहाण केली. या मारहाणीमध्ये राजू भिसे गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे.

या प्रकरणी राजू भिसेची आई  सुनीता भिसे यांनी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून विश्रांतवाडी पोलिसांनी  प्रतीक ओव्हाळ, सुनील ओव्हाळ, आशिष मोरे आणि जीवन परियार या चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.  या प्रकरणाचा अधिक तपास विश्रांतवाडी पोलीस करत आहे.

Published by: sachin Salve
First published: January 16, 2021, 10:01 AM IST
Tags:

ताज्या बातम्या