भिवंडी, 30 सप्टेंबर : भिवंडी तालुक्यातील पडघा नजीकच्या खानिवली ग्रामपंचायत येथील दोन वर्षांपूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणूच्या रागातून एक युवकास घरात शिरून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या तरुणाला भिवंडी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
पंकज जयवंत तुंगारे (वय 26) असं या तरुणाचं नाव आहे. पंकज तुंगारे हा तरुण आपल्या शेतावरून घरी एकटाच दुचाकीवरून जात असताना वासींद अंबाडी रस्त्यावरील खानिवली तलावा शेजारी समीर नामदेव दळवी व रोशन काटस्कर यांनी त्यास अडवून शिवीगाळ केली. त्यानंतर पंकज याने भीतीने घरी पळ काढला असता समीर नामदेव दळवी, शेखर दळवी, रोहित तुंगारे, रोशन तुंगारे, तुकाराम दळवी व त्यांच्या सोबत आलेल्या दोन ते तीन इसमांनी पंकजच्या घराबाहेर येत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
पोलिसांच्या मुलांनीच तोडला नियम, व्हायरल झाला विनामास्क क्रिकेट खेळतानाचा VIDEO
काही वेळांनी या सर्वांनी पंकजच्या घरात घुसून स्टीलच्या रॉडने पाठीवर, डोक्यात व उजव्या हाताच्या मनगटावर बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्या साथीदारांनीही त्यास घराबाहेर खेचून ठोशाबुक्याने व लाथेने मारहाण करून जखमी केले. त्यानंतर घटनास्थळावरून सर्व जण पळून गेले.
या घटनेनंतर पंकज आणि त्याच्या भावाने पडघा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पंकजला भिवंडी येथील प्राईम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी स्थानिक शहर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी त्याची तक्रार नोंदवून घेत भादवी कलम 326, 141, 143, 146, 147, 149 नुसार आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करून तो पडघा पोलिसांकडे वर्ग केला आहे.
ड्रग्ज कनेक्शनमध्ये अक्षय कुमारही? NCB च्या तपासात A नाव समोर येताच माजली खळबळ
पंकज तुंगारे याच्या हाताच्या मनगटावर चार फॅक्चर असून या प्रकरणी पडघा पोलिसांनी आरोपीं विरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करून आरोपींना कडक शासन करावे अशी मागणी करीत असतानाच पोलिसांनी आरोपींच्या तक्रारी वरून आमच्या वरच गुन्हा दाखल केला हे चुकीचे असल्याचे नमूद केले आहे .दरम्यान याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्याचे व पो निरी सुरेश मनोरे यांच्याशी संपर्क साधला असता शासकीय वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले नंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगितले .
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime