Home /News /crime /

नवरी ब्युटी पार्लरमध्ये मेकअप करायला गेली ती परतलीच नाही, नवरदेव करत राहिला प्रतीक्षा

नवरी ब्युटी पार्लरमध्ये मेकअप करायला गेली ती परतलीच नाही, नवरदेव करत राहिला प्रतीक्षा

नवरदेव वरात घेऊन नवरीची प्रतीक्षा करीत होता.

    भोपाळ, 19 मे : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) इंदूरच्या एमजी रोडजवळ नवरीला घेऊन जाण्यासाठी तिच्या घरी पोहोचला होता. लग्नासाठी नवरी मैत्रिणींसह ब्युटीपार्लरला गेली होती. मात्र ती ब्युटी पार्लरमधून परतलीच नाही. यानंतर नवरदेवाच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. मिळालेल्या माहितीनुसार, इंदूरच्या एमजी रोडजवळील उषा फाटकमध्ये उज्जैनमध्ये नवरदेव वरात घेऊन आला होता. मात्र मेकअप करण्यासाठी अन्नपूर्णा भागात गेली होती. नवरीचा प्रियकर ब्युटी पार्लरसमोरच उभा होता. ती तेथूनच पळून गेली. कुटुंबीय नवरीचा शोध घेऊ लागले. बराच वेळ झाला तरी नवरी परतली नाही. यानंतर नेमका खुलासा झाला. नवरदेवाने एमजी रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे. पोलीस ठाण्यात बसून नवरदेव बरेच तास नवरीची प्रतिक्षा करीत होता. मात्र नवरी आलीच नाही, शेवटी नवरदेव वरात घेऊन परतला. एमजी रोड पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी सुरेंद्र नादान यांनी सांगितले की, बुधवारी रात्री जितेंद्रची उज्जैन येथून मिरवणूक आली होती. ज्याचा विवाह उषा फाटक जेलरोड येथील रहिवासी असलेल्या रोशनीसोबत होणार होता. वधू घरी नसल्याची तक्रार नवरदेवाचे काका राकेश डागर यांनी केली आहे. ती दुसऱ्या कुणासोबत पळून गेली. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. त्याचबरोबर वधू बेपत्ता झाल्याची नोंद अन्नपूर्णा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Marriage

    पुढील बातम्या