मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पहिल्यांदाच सासरी आलेल्या नवरीचं ते रूप पाहून नवरदेव फरार; जाणून घ्या प्रकरण

पहिल्यांदाच सासरी आलेल्या नवरीचं ते रूप पाहून नवरदेव फरार; जाणून घ्या प्रकरण

महिलेनं पोलिसांना सांगितलं की 8 महिन्यापूर्वी तिने गावातील हरी राम नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमविवाह केला. मात्र आठ महिने उलटूनही तिचा पती तिला आपल्या घरी घेऊन जात नव्हता.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 19 डिसेंबर : नुकतंच एक अतिशय अजब प्रकरण (Weird Incident) समोर आलं आहे. यात नवरीबाई (Bride) पहिल्यांदाच सासरी जाऊन थेट धरणे आंदोलनाला बसली. तर हे पाहून नवरदेव तिथून फरार झाला. सासरकडच्या लोकांनी नवरीला समजवण्याचा भरपूर प्रयत्न केला मात्र तिनं कोणाचंच ऐकलं नाही. अखेर पोलिसांनाच यात दखल घ्यावी लागली आणि पोलिसांनी नवरीला आपल्यासोबत ठाण्यात नेलं. हे प्रकरण झारखंडच्या गोड्डा येथील कन्भरा गावातील आहे.

आई करत होती दुसरं लग्न; मुलीनं फोटो शेअर करत दिलं असं कॅप्शन की पाणावतील डोळे

महिलेनं पोलिसांना सांगितलं की 8 महिन्यापूर्वी तिने गावातील हरी राम नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमविवाह केला. मात्र आठ महिने उलटूनही तिचा पती तिला आपल्या घरी घेऊन जात नव्हता. यामुळे तीच आपल्या घरच्यांसोबत सासरी पोहोचली. मात्र सासरकडच्यांनी तिला घरात प्रवेश करू दिला नाही.

महिलेनं सांगितलं की प्रथा-परंपरेनुसार तिचं लग्न मंदिरात झालं. मात्र तरीही तिचा पती तिला घरी घेऊन जाण्यास तयार नव्हता. तो महिलेला हे सांगून घरी नेत नसे की आधी मी माझ्या घरच्यांसोबत बोलेल आणि त्यानंतर तुला घरी घेऊन जाईल. असंच करत लग्नाला आठ महिने झाले. यावरुन दोघांमध्ये भांडण होऊ लागलं आणि एक दिवस तिचा पतीच घरातून फरार झाला.

यानंतर महिलेनं स्वतःच सासरी जाण्याचा निर्णय घेतला. सासरी जात तिने नवऱ्याच्या घरच्यांना हे सर्व सांगितलं. मात्र त्यांनी या महिलेवर विश्वास ठेवला नाही. यानंतर महिला घराबाहेरच धरणे आंदोलनाला बसली. हा पाहताच पती तिथून फरार झाला. महिलेनं असा दावा केला आहे की तिच्याकडे लग्नाचे सगळे पुरावे उपलब्ध आहेत.

औरंगाबाद: बडा घर अन् पोकळ वासा; 20 लाखांसाठी डॉक्टर पतीकडून विवाहितेचा अमानुष छळ

महिला धरणे आंदोलनाला बसल्याचं पाहून गावातील लोकही तिथे जमले. प्रकरण वाढतच चालल्याने पोलिसांना बोलावलं गेलं. पोलीस या महिलेला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. पोलिसांनी माध्यमांना माहिती देत सांगितलं की महिलेनं तक्रार देण्यास नकार दिला आहे. तिला सर्वांच्या इच्छेने आणि आनंदात आपल्या सासरी जायचं आहे. मात्र, सासरकडचे लोक तिला घरात घ्यायला तयार नाहीत.

First published:

Tags: Bride, Wedding