Home /News /crime /

वरात दारात येण्याआधीच नवरी फरार; प्रियकरासोबत मिळून केलं हे धक्कादायक काम

वरात दारात येण्याआधीच नवरी फरार; प्रियकरासोबत मिळून केलं हे धक्कादायक काम

नवरीने आधी आपल्या कुटुंबीयांना गुंगीचं औषध टाकून चहा पिण्यास दिला आणि बेशुद्ध केलं, यानंतर ती घरातून दागिने आणि रोकड घेऊन फरार झाली

  नवी दिल्ली 19 डिसेंबर : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) फिरोजाबादमधून एक अजब प्रकरण समोर आलं आहे. यात एक नवरीबाई वरात दारात येण्याच्या काही तास आधीच घरातून फरार झाली (Bride Ran Away on Wedding Day). तिने आधी आपल्या कुटुंबीयांना गुंगीचं औषध टाकून चहा पिण्यास दिला आणि बेशुद्ध केलं, यानंतर ती घरातून दागिने आणि रोकड घेऊन फरार झाली. मिळालेल्या माहितीनुसार, ती आपल्या प्रियकरासोबत फरार झाली (Bride Ran Away With Lover). आई करत होती दुसरं लग्न; मुलीनं फोटो शेअर करत दिलं असं कॅप्शन की पाणावतील डोळे मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना फिरोजाबादच्या कौशल्या ठाण्याच्या परिसरातील आहे. या मुलीच्या बहिणीचं असं म्हणणं आहे की तिचं गल्लीतील एका युवकासोबत अफेअर होतं. ती त्याच्यासोबतच फरार झाली. महिलेनं पळून जाण्याआधी चहामध्ये काहीतरी मिसळलं होतं. यामुळे हा चहा पिताच कुटुंबातील सहा लोक बेशुद्ध झाले. यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शेजाऱ्यांनी सांगितलं की या तरुणीच्या सहमतीशिवाय तिचं लग्न लावलं जात होतं. तिला हे लग्न करायचं नव्हतं. कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितलं की शुक्रवारी रात्री घरी संगीताचा कार्यक्रम होता. कार्यक्रमानंतर शेजारचे लोक निघून जाताच महिलेनं आपल्या घरच्यांना चहामध्ये काहीतरी मिसळून दिलं. हा चहा पिताच घरातील लोक बेशुद्ध झाले. शुद्धीवर आल्यानंतर आपण रुग्णालयात असल्याचं त्यांना समजलं. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तक्रार दाखल करत या मुलीचा तपास सुरू केला आहे.

  पहिल्यांदाच सासरी आलेल्या नवरीचं ते रूप पाहून नवरदेव फरार; जाणून घ्या प्रकरण

  मिळालेल्या माहितीनुसार, नवरीबाई घरातून फरार झाल्यानंतर सुरुवातीला तिचा शोध घेण्यात आला. मात्र ती न सापडल्याने तिच्या लहान बहिणीचंच नवरदेवासोबत लग्न लावलं गेलं. पोलिसांनी सांगितलं की या नवरीचा शोध घेतला जात असून लवकरच तिला ताब्यात घेण्यात येईल.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Bride, Wedding

  पुढील बातम्या