Home /News /crime /

फेरे घेतल्यानंतर मंडपातून अचानक गायब झाली नवरी, सत्य समजताच सरकरली नवरदेवाच्या पायाखालची जमीन

फेरे घेतल्यानंतर मंडपातून अचानक गायब झाली नवरी, सत्य समजताच सरकरली नवरदेवाच्या पायाखालची जमीन

एका लग्नातील (Marriage) अजब प्रकार समोर आला आहे. या घटनेत नवरदेवासोबत सात फेरे घेतल्यानंतर नवरीबाई अचानक (Bride) मंडपातून फरार झाली आहे

    लखनऊ 22 मे : एका लग्नातील (Marriage) अजब प्रकार समोर आला आहे. या घटनेत नवरदेवासोबत सात फेरे घेतल्यानंतर नवरीबाई अचानक (Bride) मंडपातून फरार झाली आहे. नवरी सगळे दागिने घेऊन आपल्या प्रिकरासोबत फरार झाली. या गोष्टीचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा लग्नाचे उरलेल्या पुढचे विधी पूर्ण करण्यासाठी नवरीची शोधाशोध सुरू झाली. नवरी कुठेच न दिसल्यानं मंडपात एकच गोंधळ उडाला. नवरीच्या या कृत्यामुळे सगळेच हैराण झाले. हेही वाचा - अपहरण झालेल्या नातीचा आजोबांना दीड वर्षानं आला फोन,हाल ऐकून सरकली पायाखालची जमीन हे प्रकरण उत्तर प्रदेशच्या प्रतापगढमधील (Pratapgarh) रानीगंज ठाण्याच्या परिसरातील आहे. यात तरुणीचं लग्न फतनपुर भागातील एका तरुणाशी ठरलं होतं. ठरल्यानुसार, शुक्रवारी संध्याकाळी वरात नवरीच्या घरी पोहोचली. यानंतर मुलीकडच्या लोकांनी वरातीचं स्वागतही केलं. यानंतर नवरदेव आणि नवरीनं सात फेरेदेखील घेतले आणि सात जन्म सोबतच राहाण्याचं वचनही दिलं. लग्नानंतर वराती आणि घरच्यांचा डोळा चुकवून नवरी दागिने घेऊन फरार झाली. हेही वाचा - जेजुरीत चोरट्यांनी पळवलं ATM मशीन; अवघ्या काही तासांत पोलिसांनी लावला शोध नवरी मंडपातून पळून गेल्याचं माहिती होताच नवरदेवाच्या पायाखालची जमीनच सरकली. दोन्ही पक्षांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. यानंतर नवरदेव नवरीला न घेताच रिकाम्या हाती घरी परतला. हे अजब लग्न सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तर, याप्रकरणी बोलताना रानीगंजच्या सीओंनी सांगितलं, की दोन्ही पक्षांकडून याबाबत काहीही तक्रार केली गेली नाही. परिसरात सुरू असलेल्या चर्चेमुळे आम्हाला या घटनेची माहिती मिळाली आहे. दोन्ही पक्षापैकी कोणीही तक्रार केल्यास याप्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Bridegroom, Crime, Marriage

    पुढील बातम्या