Home /News /crime /

'कधीही शारीरिक संबंध ठेवणार नाही'; 4 वर्ष रिलेशन अन् घरच्यांच्या विरोधात जात लग्न केल्यावर नवरीचा अजब निर्णय

'कधीही शारीरिक संबंध ठेवणार नाही'; 4 वर्ष रिलेशन अन् घरच्यांच्या विरोधात जात लग्न केल्यावर नवरीचा अजब निर्णय

हनिमूनला नवरीने नवऱ्याला सांगितलं की तिला शारीरिक संबंध ठेवायला अजिबात आवडत नाही. सुरुवातीला नवरदेवाला वाटलं की कदाचित ती मस्करी करत आहे. परंतु नवरीने हे पूर्णपणे स्पष्ट केलं की ती कोणत्याही परिस्थितीत कधीही शारीरिक संबंध ठेवणार नाही

पुढे वाचा ...
    लखनऊ 14 मे : उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये एका नववधूने हनिमूनच्या रात्री शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला. या प्रकरणातील आश्‍चर्यकारक बाब म्हणजे या जोडप्याचे गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. दोघांचेही कुटुंबीय या नात्यासाठी तयार नव्हते, मात्र प्रेमापुढे घरच्यांनी हार मानली आणि थाटामाटात दोघांचं लग्न लावून दिलं. पण हनीमूनला नवरी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देऊ लागल्याने (Bride Denied Sexual Relation after Love Marriage) ही घटना ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हनिमूनला नवरीने नवऱ्याला सांगितलं की तिला शारीरिक संबंध ठेवायला अजिबात आवडत नाही. सुरुवातीला नवरदेवाला वाटलं की कदाचित ती मस्करी करत आहे. परंतु नवरीने हे पूर्णपणे स्पष्ट केलं की ती कोणत्याही परिस्थितीत कधीही शारीरिक संबंध ठेवणार नाही, कारण तिला तसं करणं आवडत नाही. हे ऐकून नवरदेवाच्या पायाखालची जमीनच सरकली. घरच्यांनी मुलीला खूप समजावलं, पण ती तयार झाली नाही आणि शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देत राहिली. प्रेमविवाहानंतर नवरीचा हा निर्णय ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हा गंभीर प्रश्न पंचायतीमध्ये सोडवण्याचा प्रयत्न केला गेला पण वधू आपल्या निर्णयावर ठाम राहिली. यानंतर सासरच्या लोकांनी तिला महिला उत्थान केंद्रात नेलं. जिथे तिचं समुपदेशन करण्यात आलं, परंतु तिथेही तिने शारीरिक संबंध ठेवण्यास स्पष्ट नकार दिला. मग दोघांनीही आपापल्या इच्छेनं हे नातं संपवण्याचा निर्णय घेतला. 'पती-पत्नीने न्यायालयाबाहेर तडजोड केली तरी आमचा आदेश संपत नाही', कोर्टाने असं का म्हटलं? नारी उत्थान केंद्राच्या समुपदेशक रितू नारंग यांनी याबाबत सांगितलं की, हे लग्न प्रेमविवाह होता. ज्यामध्ये मुलगी आणि मुलामध्ये गेल्या 4 वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. तरुणीने तिच्या प्रियकराला सांगितलं की, जर त्याने तिच्याशी लग्न केलं नाही तर ती विष प्राशन करून आत्महत्या करेल. मुलीने मुलाच्या आईला आणि वहिनीलाही हेच सांगितलं. एवढंच नाही तर ती मुलाच्या घरीही गेली आणि तू लग्न केलं नाहीस तर मी विष प्राशन करेल, अशी धमकी तिने दिली होती. यानंतर मुलगा लग्नासाठी तयार झाला. मुलाची आई मुलीच्या कुटुंबीयांकडे गेली आणि त्यांच्यासमोर दोघांच्या विवाहाचा प्रस्ताव मांडला. मुलीकडचे या लग्नाला तयार नव्हते. पण मुलीच्या आग्रहापुढे तेही लग्नासाठी तयार झाले. दोन्ही कुटुंबातील लोकांनी आनंदाने लग्न लावून दिलं. लग्नानंतर पहिल्या रात्रीच नवरी म्हणाली, 'I am not Comfortable' म्हणजे मी अजून सेक्स करायला तयार नाही. हे दोघंही लग्नाआधीच 4 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. मुलीचं वय 23 वर्षे आहे. समुपदेशक रितू नारंग यांनी सांगितलं की, मुलगा तिच्यावर खूप प्रेम करतो. त्या मुलाने मुलीला सांगितलं की, जेव्हा तुला योग्य वाटेल तेव्हा मला सांग. त्यानंतर मुलगी काही दिवसांसाठी तिच्या माहेरी गेली. परत आल्यावर नवऱ्याने विचारलं, काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा मुलगी म्हणाली, मला सेक्स करायला भीती वाटते. मी सेक्स करणार नाही.' मुलगा म्हणाला काही फरक पडत नाही, आपण यासाठी काहीतरी उपचार घेऊ. यादरम्यान पतीने कधीही तिच्याशी गैरवर्तन केलं नाही आणि माझी वहिनी तुला डॉक्टरकडे घेऊन जाईल, असं सांगितलं. मुलीला डॉक्टरांकडे पाठवले. काही काळ तिच्यावर उपचारही केले गेले आणि ती तिच्या माहेरी गेली. त्यानंतर मुलीने तिच्या आईला सांगितलं की तिला सेक्सची भीती वाटते. मला सासरच्या घरी परत जायचं नाही. आईनेही तिला खूप समजावलं आणि डॉक्टरांना दाखवलं. मुलीवर उपचारही सुमारे ३-४ महिने चालले, पण काहीच फायदा झाला नाही. विवाहाच्या रिसेप्शन पार्टीत चक्क वधूनेच केला आनंदाच्या भरात गोळीबार समुपदेशक रितू नारंग सांगतात की, मुलीचं 4 वर्षांपासून या तरुणावर प्रेम होतं आणि नंतर लग्न करण्यासाठीही ती मागे लागली. पुढे तिने घटस्फोट घेण्याचा आग्रह धरला. तेव्हा मुलीला सांगण्यात आलं की, तुला हे माहीत असताना तू त्या मुलाला का सांगितलं नाहीस? तुला लग्न का करायचं होतं? दोन कुटुंबांना त्रास का दिला? याबाबत दोन्ही कुटुंबातील लोकांशी चर्चा करण्यात आली. पण कोणीही एकमेकांवर आरोप केले नाहीत. या विषयावर दोन्ही पक्षांनी आपसात चर्चा केली आणि त्यांची मतंही सारखीच होती. . या प्रकरणात आपल्या मुलीची चूक असल्याचं मुलीच्या आईचं म्हणणं आहे. मुलाचं आयुष्य खराब होऊ नये असं तिला वाटतं. तिने सांगितलं की तो मुलगा खूप छान आहे. त्याने आम्हाला खूप साथ दिली. दोघांनाही समजावून वेगळं केलं पाहिजे. मुलगा वेगळं व्हायला अजिबात तयार नव्हता. मुलाने तर सांगितलं होतं की तो आयुष्यभर सेक्स करणार नाही, तो तिच्यासोबत राहण्यास तयार आहे. तू म्हणशील तिथे जाऊन उपचार करून घेऊ. मात्र मुलीने कोणत्याही परिस्थितीत आपल्याला घटस्फोट हवा असल्याचं सांगितलं. समुपदेशक रितू नारंग यांच्या म्हणण्यानुसार, मुलीचं मानसिक संतुलन थोडेसं ढासळलं होतं, कारण आधी तिने प्रेमप्रकरणासाठी आग्रह धरला, नंतर तिने प्रेमाविवाहाचा आग्रह धरला आणि तिसरा घटस्फोट घेण्याचा आग्रह धरला. त्यामुळेच त्यांनी मुलीच्या कुटुंबीयांना सल्ला दिला की, तिला चांगल्या डॉक्टरांना दाखवावं आणि तिचं कुठेही लग्न करू नये.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Bridegroom, Love story, Wedding

    पुढील बातम्या