मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

ग्रामीण बँक मॅनेजरने जुगारात उडवले ग्राहकांचे एक कोटी रुपये, एका कस्टमरमुळे अशी समोर आली चोरी

ग्रामीण बँक मॅनेजरने जुगारात उडवले ग्राहकांचे एक कोटी रुपये, एका कस्टमरमुळे अशी समोर आली चोरी

मॅनेजरनंच ग्राहकांच्या पैशांवर डल्ला मारला आहे. प्रसूनदीप अत्री, असं नाव असलेला ब्रँच मॅनेजर ग्राहकांच्या खात्यातील पैसे वापरून ऑनलाईन जुगार (Online gambling) खेळत होता.

मॅनेजरनंच ग्राहकांच्या पैशांवर डल्ला मारला आहे. प्रसूनदीप अत्री, असं नाव असलेला ब्रँच मॅनेजर ग्राहकांच्या खात्यातील पैसे वापरून ऑनलाईन जुगार (Online gambling) खेळत होता.

मॅनेजरनंच ग्राहकांच्या पैशांवर डल्ला मारला आहे. प्रसूनदीप अत्री, असं नाव असलेला ब्रँच मॅनेजर ग्राहकांच्या खात्यातील पैसे वापरून ऑनलाईन जुगार (Online gambling) खेळत होता.

शिमला, 8 ऑक्टोबर : बँकेमध्ये आपले पैसे सुरक्षित राहतात आणि त्यावर व्याजही मिळतं, हा विचार करून नागरिक बँकेत पैसे ठेवतात. गेल्या काही काळात ऑनलाइन फ्रॉडच्या (Online Fraud) वाढत्या प्रकरणांमुळे तिथेदेखील पैसे सुरक्षित नसल्याचं वेळोवेळी सिद्ध झालं आहे. पण, जर आपण आवश्यक ती काळजी घेतली तर बँकेत पैसे सुरक्षित असल्याचा दावा बँका करतात. आजही नागरिक बँकेत पैशांची गुंतवणूक करतात. मात्र, हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) कुंपणानंच शेत खाल्ल्याचा प्रकार समोर आला आहे. कुल्लुतील हिमाचल ग्रामीण बँकेच्या दोहरानाला शाखेतील (Doharanala Bank Branch) मॅनेजरनंच ग्राहकांच्या पैशांवर डल्ला मारला आहे. प्रसूनदीप अत्री, असं नाव असलेला ब्रँच मॅनेजर ग्राहकांच्या खात्यातील पैसे वापरून ऑनलाईन जुगार (Online gambling) खेळत होता. जुगार जिंकल्यानंतर पुन्हा त्या खात्यांमध्ये पैसे टाकत होता. यासर्व प्रकारात त्याने कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याची धक्कादायक गोष्ट उघड झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुल्लु जिल्ह्यातील रहिवासी असलेले धरमचंद हे पासबुक अपडेट करण्यासाठी हिमाचल ग्रामीण बँकेत (Himachal Gramin Bank) गेले होते. पासबुक अपडेट केल्यानंतर त्याच्या बँक खात्यातून चार लाख रुपये काढल्याची नंतर पुन्हा जमा केल्याची एंट्री दिसली. किसान क्रेडिट लिमिट सुविधेचा वापर करून हे चार लाख रुपये काढण्यात आले होते. हा नेमका काय प्रकार आहे, हे जाणून घेण्यासाठी धरमचंद यांनी शाखा व्यवस्थापकाशी संपर्क साधला. सॉफ्टवेअरमधील तांत्रिक बिघाडामुळे पासबुकवर तशी नोंद आल्याचं त्यांना सांगण्यात आलं. मात्र, धरमचंद यांच्या शंकेचं समाधान झालं नव्हतं. त्यांनी आपल्या ओळखीतील लोकांना आपापलं बँक पासबुक अपडेट करण्यास सांगितलं. तेव्हा अनेकांच्या खात्यांमध्ये अशाच प्रकारची गडबड झाल्याची बाब समोर आली.

लपायला गेली अन् आयुष्यभरासाठी झाली नजरेआड; लिफ्टमधून पडून चिमुकलीचा दुर्दैवी अंत

त्यानंतर सर्वांनी मिळून बँकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची तक्रार केली. त्यानंतर झालेल्या चौकशीत ब्रँच मॅनेजरंच (Branch Manager) पैशांची अफरातफर करत असल्याचं उघड झालं. पोलिसांनी आरोपी ब्रँच मॅनेजर प्रसूनदीप अत्रीला अटक केली आहे. मूळचा राजस्थानमधील चुरू येथील रहिवासी असलेला प्रसूनदीप अत्री हा दीड वर्षांपूर्वी हिमाचलमधील दोहरानाला बँक शाखेत व्यवस्थापक होता. त्याला ऑनलाइन जुगार खेळण्याची आणि शेअर मार्केटमध्ये (Share Market) पैसे गुंतवण्याची सवय होती. सुरुवातीला तो आपल्या पगारातील पैसे गुंतवत राहिला. मात्र, आपल्याकडील पैसे संपल्यानंतर त्याने ग्राहकांच्या खात्यातून पैसे काढण्यास सुरुवात केली. आरोपी बँक अधिकारी अतिशय हुशारीने ठराविक ग्राहकांच्या खात्यांना लक्ष्य करत होता. जे ग्राहक वर्षातून फक्त दोन-चार वेळा बँकेत येत असत आणि ज्यांनी बँकेकडून एसएमएस अलर्टची (Bank SMS Alert) सुविधा घेतली नव्हती, अशा खात्यांतून आरोपी पैसे काढत होता. हे प्रकरण समोर आल्यानंतर आरोपी प्रसूनदीप राजस्थानला पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, कुल्लू पोलिसांनी त्याला त्यापूर्वी अटक केली. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी (2021) त्याने 35 लाख 75 हजार रुपयांचा, तर आतापर्यंत एकूण एक कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. सध्या बँकेचं एक पथक या प्रकरणाचा सखोल तपास करत असून आरोपी व्यवस्थापकाला निलंबित करण्यात आलं आहे. बँक घोटाळ्याचं प्रकरण समोर आल्यानंतर उर्वरित खातेदारही आपले पासबुक अपडेट करण्यासाठी बँकेत पोहोचले आहेत.

विचित्र! प्रेमात माथेफिरू तरुणाने प्रेयसीचे नाक आणि कान कापले; नंतर बसला रडत

आतापर्यंत या घोटाळ्याला बळी पडलेल्या 10 खातेदारांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलिसांनी आरोपी बँक मॅनेजरला अटक केली असून त्याला 5 दिवसांच्या रिमांडवर घेतलं आहे. रिमांड दरम्यान त्याची चौकशी करण्यात येणार आहे. जेणेकरून त्याच्यासोबत आणखी कोणी सामील होता हे समजू शकेल. सर्व ग्राहकांचे पासबुक अपडेट झाल्यावरच घोटाळ्याची एकूण रक्कम कळेल, अशी माहिती कुल्लूचे एसपी गुरदेव शर्मा यांनी दिली. या प्रकरणामुळे बँकांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. जर, बँक अधिकारीचं अशा प्रकारे ग्राहकांची फसवणूक करत असतील तर ग्राहकांनी कुणावर विश्वास ठेवायचा? असा प्रश्न ग्राहकांनी उपस्थित केला जात आहे.
First published:

Tags: Financial fraud, Money fraud

पुढील बातम्या