Home /News /crime /

मुलीला पळवून लग्न केले म्हणून मुलाच्या वडिलांना झाडाला बांधून मारहाण,पंढरपुरातला VIDEO

मुलीला पळवून लग्न केले म्हणून मुलाच्या वडिलांना झाडाला बांधून मारहाण,पंढरपुरातला VIDEO

मंगळवेढ्यातील भाळवणी गावात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे पंढरपुरात एकच खळबळ उडाली आहे.

पंढरपूर, 12 ऑगस्ट : देवाची नगरी पंढरपूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. मुलीला पळवून नेऊन लग्न केल्या प्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या वडिलांना दोरीने झाडाला बांधून मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. मंगळवेढ्यातील भाळवणी गावात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे पंढरपुरात एकच खळबळ उडाली आहे. भाळवणी गावात राहणाऱ्या एका तरुणाने प्रेमसंबंधातून  मुलीला पळवून नेऊन लग्न केले होते. त्यामुळे संतापलेल्या मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या घरावर हल्ला केला.  या घटनेने संतप्त झालेल्या मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या वडिलांना घरापासून तीन कि.मी अंतरावरून दोरीने बांधून गावापर्यंत मारहाण करत आणले व गावातील भर चौकातील लिंबाच्या झाडाला बांधून मारहाण करण्यात आली. गावाच्या चौकात या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला.  गावकऱ्यांची एकच गर्दी उसळली होती. त्यामुळे गावातील लोकांनी  वेळीच हस्तक्षेप करून मुलाच्या वडिलांची सुटका केली. गावातील लोकांनी या घटनेबद्दल पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी मारहाण करणाऱ्या नातेवाईकांना ताब्यात घेतले आहे.  मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मंगळवेढा पोलीस करत आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: पंढरपूर, मंगळवेढा, लग्न, लव्ह मॅरेज

पुढील बातम्या