पुणे, 7 डिसेंबर : प्रेम (Love) ही संकल्पना फार सुंदर आहे. प्रेमात वाद-विवाद (Dispute) झाले तर माणूस एकमेकांच्या आणखी जवळ येतो. भांडणानंतर आपल्या जोडीदारापासून आपण दूर गेल्यानंतर आपल्याला आपल्या जोडीदाराची कमी जाणवते. त्या व्यक्तीचं आपल्या आयुष्यात असण्यामागचं प्रत्येक कारण आपल्याला त्या दुराव्यातून जाणवत जातं. त्याच दुराव्यातून दोन मनं पुन्हा एकत्र येतात. खरंतर दुरावाच दोघांच्या अस्तित्वाची जाणीव करुन त्यांच्या मनाची पुन्हा एकदा घट्ट गुंफन करतो. पण त्यासाठी आपला जोडीदार तितका पात्र असयाला हवा. त्यामुळे कधीही आपण ज्या व्यक्तीच्या प्रेमात आहोत ती व्यक्ती त्या पात्रतेची आहे ना? याची शहानिशा जरुर करावी. अन्यथा नंतर पश्चात्ताप किंवा मनस्तापाशिवाय दुसरं काहीच शिल्लक राहत नाही. अशीच काहिशी प्रचिती पुण्यात (Pune) एका पीडित तरुणीला आली आहे. पीडितेने आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल अखेर सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) तक्रार केली आहे.
पीडित 29 वर्षीय तरुणी ही पुण्यात एका आयटी कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करते. त्याच कंपनीत तिचा सहकारी असलेल्या एका तरुणासोबत तिची मैत्री झाली. त्याच मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांमध्ये सर्व काही आलबेल सुरु होतं. दोघांनी लग्न करण्याचं ठरवलं होतं. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांच्या नात्यामध्ये थोडा तणाव निर्माण झाला होता. दोघांचे वारंवार भांडणं होऊ लागलं. त्यांच्या शेवटचं भांडण प्रचंड मोठं झालं. त्यामुळे मुलीने वेगळा होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि त्यांनी एकमेकांसोबत असलेले संपर्क तोडले. त्यांचा ब्रेकअप झाला.
हेही वाचा : जे कुणालाच जमलं नाही ते गुजरातने करुन दाखवलं, बलात्काराच्या आरोपीला तातडीने फाशीची शिक्षा
पीडितेने सर्वं संबंध तोडल्यामुळे तिच्या प्रियकराला राग आला. त्याच रागातून त्याच्या डोक्यात एक सैतान जागी झाला. त्याने विकृत मार्गाने पीडितेला अद्दल घडविण्याचा निर्णय घेतला. त्यातून त्याने पीडितेचा न्यूड व्हिडीओ व्हायरल केला. त्याने मित्र-मैत्रणींसह अनेकांना प्रेयसीचा व्हिडीओ पाठवत व्हायरल केला. आरोपीच्या या विकृत कृत्याची माहिती जेव्हा पीडितेला लागली तेव्हा तिला खूप त्रास झाला. ती आतून खचली. तिने तातडीने पोलिसात विकृत प्रियकराची तक्रार करण्याता निर्णय घेतला.
हेही वाचा : गुंगीचं औषध देत 17 मुलींवर लैंगिक अत्याचार; प्रॅक्टिकलच्या बहाण्याने नेलं अन्...
पीडिता तातडीने सांगवी पोलीस ठाण्यात गेली. तिथे तिने पोलिसांना संबंध प्रकार सांगितला. संबंधित प्रकरण ऐकून पोलीसही चक्रावले. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीची गांभीर्यने दखल घेतली आहे. पोलीस आरोपी प्रियकराचा शोध घेत आहेत. दरम्यान, अशाप्रकारचा प्रकार कुणासोबतही घडू नये यासाठी काळजी घ्यावी, असं आवाहव पोलिसांनी तरुण-तरुणींना केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.