मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

प्रियकराने न्यूड फोटोची केलेली मागणी जीवावर बेतली; अल्पवयीन मुलीने केली आत्महत्या

प्रियकराने न्यूड फोटोची केलेली मागणी जीवावर बेतली; अल्पवयीन मुलीने केली आत्महत्या

Suicide news: प्रियकराने सातत्यानं न्यूड फोटोची मागणी (Boyfriend demand nude photo) केल्याने एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या (Minor girl commits Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली.

  • Published by:  News18 Desk

कोलकाता, 5 एप्रिल: प्रियकराने सातत्यानं न्यूड फोटोची मागणी (Boyfriend demand nude photo) केल्याने एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या (Minor girl commits Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली. आरोपी प्रियकर गेल्या काही दिवसांपासून आपल्या प्रेयसीकडे न्यूड फोटो आणि व्हिडीओची (Nude video) मागणी करत होता. अनेकदा नकार दिल्यानंतरही त्याने आपला हट्ट सोडला नाही. त्यामुळे सततच्या मागणीला कंटाळलेल्या 14 वर्षीय अल्पवयीने मुलीने आत्महत्या करून जीव दिला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

संबंधित घटना पश्चिम बंगाल राज्यातील जलपाईगुडी जिल्ह्यातील आहे. येथील एका अल्पवयीन मुलीचे धुपगुरी गावातील तरुणाशी प्रेमसंबंध होते. आरोपी तरुण आपल्या प्रेयसीकडे सातत्याने न्यूड फोटोची मागणी करत होता. अल्पवयीन मुलीनं असे फोटो पाठवण्यास त्याला अनेकदा नकार दिला. पण हट्टाला पेटलेल्या प्रियकराने तिच्यावर दबाब आणायला सुरुवात केली. तसंच ब्रेकअप करण्याची धमकीही दिली.

प्रेमसंबंध तुटण्याच्या धमकीमुळे घाबरलेल्या अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली आहे. संबंधित घटना रविवारी घडली आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली असून आरोपीला अटक करण्याची मागणी मृत मुलीच्या नातेवाईकांनी केली आहे. पण मृत मुलीने आत्महत्येपूर्वी सुसाइड नोट न लिहिल्याने मृत्यूच्या कारणाबाबत संभ्रम झाला आहे.

(वाचा- आत्महत्या की हत्या? गळफास लागलेल्या अवस्थेत आढळला तरुणाचा मृतदेह, गावात खळबळ)

मृत मुलीच्या वडीलांनी बानरहाट पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती देताना संबंधित पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, मृत मुलगी तिच्या प्रेमसंबंधामुळे खूप दबावात जगत होती. याच कारणामुळे तिने टोकाच पाऊल उचललं असावं, असा संशय व्यक्त केला जात आहे. मृत मुलीच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केल्यानंतर तपास सुरू करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार असून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

First published:

Tags: Suicide, West bengal