मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

स्वतःचं प्रेम सिद्ध करण्यासाठी प्रियसीनं केला न्यूड व्हिडीओ कॉल; पण प्रियकरानं केलं धक्कादायक कृत्य

स्वतःचं प्रेम सिद्ध करण्यासाठी प्रियसीनं केला न्यूड व्हिडीओ कॉल; पण प्रियकरानं केलं धक्कादायक कृत्य

पीडित मुलीनं हि रिक्वेस्ट स्वीकारली. यानंतर दोघांच प्रेम वाढू लागलं.

पीडित मुलीनं हि रिक्वेस्ट स्वीकारली. यानंतर दोघांच प्रेम वाढू लागलं.

पीडित मुलीनं हि रिक्वेस्ट स्वीकारली. यानंतर दोघांच प्रेम वाढू लागलं.

  • Published by:  Atharva Mahankal

नागपूर, 04 ऑगस्ट: प्रेम म्हणजे दोन जीवांचं नाही तर दोन मनांचं मिलन असतं असे डायलॉग्स आपण नाटकांमध्ये किंवा सिनेमांमध्ये नेहमी ऐकत असतो आणि  बघत असतो. प्रेमामध्ये एकमेकांसाठी अनेकजण जीव देण्याच्या  गोष्टी करतात किंवा ताशा आणाभाका घेतात. मात्र आपल्यावर जीवापाड प्रेम करणाराच शत्रू झाला तर? अशीच घटना (Crime news) नागपुरात घडली आहे. एका प्रियकरानं प्रियसीला न्यूड व्हिडीओ कॉल (Video call) करण्यास भाग पाडून रेकॉर्डिंग करत धमकावल्याची घटना घडली आहे.  'सकाळ'नं या संबंधीचं वृत्त प्रकाशित केलं आहे.

मुलगी आणि आरोपी प्रियकर हे दोघी एकाच गावात राहतात. मुलगी ही नागपूरच्या एका कॉलेजमध्ये द्वितीय वर्षाला शिकते. काही दिवसांपूर्वी मुलगी नागपुरात आपल्या नातेवाईकांकडे राहायला आली होती. तेव्हा तिला आरोप  वैभव आवारी हिंगणघाट, वर्धा याच फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली. आधीपासून दोघांची ओळखी असल्यामुळे पीडित मुलीनं हि रिक्वेस्ट स्वीकारली. यानंतर दोघांच प्रेम वाढू लागलं.

हे वाचा - ज्वेलर्सकडे चोरी करण्यासाठी तरुणांनी भांड्यांच्या दुकानातून काढला मार्ग

दोघांच्या प्रेमसंबंधांना तीन वर्ष झाल्यानंतर अचानक काही दिवसांपूर्वी वैभव मुलीकडे दुर्लक्ष करायला लागला.  त्यामुळे या मुलीनं त्याला सुनावलं. मात्र वैभवनं तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिला तिचं प्रेम सिद्ध करण्यास सांगितलं. मात्र यानंतर जे घडलं ते संतापजनक होतं.

यानंतर वैभव मुलीला प्रेम सिद्ध करण्यासाठी न्यूड व्हिडीओ कॉल करण्यास भाग पाडलं. वैभववर विश्वास ठेऊन मुलींना त्याला तास कॉलही केला. मात्र वैभवनं हा सगळं कॉल रेकॉर्ड केला. इतकंच नाही तर सोशल मीडियावर हे रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकीही दिली. या प्रकारामुळे मुलगी घाबरली आणि तिनं जरीपटका पोलिसांकडे तक्रार केली. मुलीनं दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी वैभवला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Nagpur