Home /News /crime /

डोळ्यादेखत प्रियकराने घेतला चिमुकल्याचा जीव; प्रेमात आंधळी झालेली आई फक्त बघत राहिली

डोळ्यादेखत प्रियकराने घेतला चिमुकल्याचा जीव; प्रेमात आंधळी झालेली आई फक्त बघत राहिली

लंडनमध्ये राहणारी लुईस लेनन आणि तिचा प्रियकर जॅक ड्रमंड यांच्यावर 15 महिन्याच्या जॅकब लेननच्या हत्येचा आरोप आहे.

    नवी दिल्ली 08 डिसेंबर : एक महिला प्रेमात इतकी आंधळी झाली की आपल्याच डोळ्यांसमोर पोटच्या बाळाला तडपताना पाहूनही तिला दया आली नाही. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या या महिलेच्या प्रियकराने तिच्या बाळाची निर्घृणपणे हत्या केली (Boyfriend Killed Child of Girlfriend). मात्र प्रियकराला थांबवण्याऐवजी ही महिला त्यालाच साथ देत राहिली. मात्र दोघेही जास्त दिवस पोलिसांपासून वाचले नाहीत. सध्या न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. मुख्याध्यापकासह 4 शिक्षकांचा विद्यार्थीनीवर गँगरेप, शिक्षिकेने बनवला VIDEO द सनने दिलेल्या वृत्तानुसार, लंडनमध्ये राहणारी लुईस लेनन आणि तिचा प्रियकर जॅक ड्रमंड यांच्यावर 15 महिन्याच्या जॅकब लेननच्या हत्येचा आरोप आहे. लुईसवर बाळाकडे दुर्लक्ष, त्याच्या हत्येचं कारण आणि हत्येसाठी परवानगी दिल्याचा आरोप आहे. तर प्रियकराविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आईला सशर्त जामीन मिळाला आहे. तर बॉयफ्रेंड जॅक ड्रमंड तुरुंगात आहे. प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान पोलिसांनी कोर्टात सांगितलं की या मुलाचा बऱ्याच काळापासून छळ केला जात होता. शवविच्छेदनात ही बाब समोर आली आहे की या बाळाचा मृत्यू डोक्यावर गंभीर मार लागल्याने झाला आहे. आरोपी प्रियकर आणि मुलाची आई हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत राहिले की या हत्येत त्यांचा काहीही हात नाही. मात्र बाळाच्या शरीरावर असलेले व्रण त्यांच्या क्रूरपणाचा पुरावा देत होते. उठता बसता पत्नीकडून सुरू होता छळ; पुण्यातील तरुणानं केला हृदयद्रावक शेवट बाळाच्या हत्येच्या दिवशी आरोपी आईने 999 वर कॉल करत सांगितलं होतं की तिच्या मुलाला श्वास घेता येत नाहीये. घटनास्थळी जात मेडिकल टीमने लगेचच त्याला रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टर त्याला वाचवू शकले नाहीत. आरोपींनी मुलाचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाल्याचं दाखवत स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र शवविच्छेदन अहवालाने त्यांच्या या प्रयत्नावर पाणी फेरलं. सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितलं की शवविच्छेदनादरम्यान बाळाच्या शरीरावर अनेक व्रण दिसून आले. यावरुन समजतं की बऱ्याच काळापासून त्याचा छळ सुरू होता. सध्या कोर्टाने या प्रकरणावर निर्णय सुनावलेला नाही.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Murder

    पुढील बातम्या