लॉकडाऊनमध्ये 16 वर्षीय गर्लफ्रेंडनं धरला पळून जाण्याचा हट्ट, 20 दिवसांनी विहिरीत सापडला मृतदेह

लॉकडाऊनमध्ये 16 वर्षीय गर्लफ्रेंडनं धरला पळून जाण्याचा हट्ट, 20 दिवसांनी विहिरीत सापडला मृतदेह

घटनेनंतर 19 दिवसानंतर पोलिसांनी त्या तरुणीचा मृतदेह विहिरीवरुन ताब्यात घेतला आणि आरोपी प्रियकर आणि त्याच्या साथीदारालाही अटक केली.

  • Share this:

फतेहपूर, 28 एप्रिल : लॉकडाऊनमध्ये हत्येचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका युवकाने त्याच्या मित्रासह आपल्या प्रियसीला मृत्यूच्या दारात ढकललं आहे. युवकाने प्रेयसीचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह गावाबाहेरच्या विहिरीत फेकला. घटनेनंतर 19 दिवसानंतर पोलिसांनी त्या तरुणीचा मृतदेह विहिरीवरुन ताब्यात घेतला आणि आरोपी प्रियकर आणि त्याच्या साथीदारालाही अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकरण असोथर पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या कुसुम्भी गावचं आहे. 16 वर्षाची तरुणी दिनेशसिंग भदोरिया नावाच्या युवकाशी प्रेमसंबंधात होती, ती खेड्यात राहत होती. वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या या प्रेम संबंधाची चर्चा संपूर्ण गावात होती. 7 एप्रिलच्या रात्री तरुणी तिच्या घरातून पळून गेली होती. कुटुंबीयांनी बरेच दिवस तिचा शोध घेतला, परंतु काही माहिती मिळाली नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी अज्ञात लोकांवर तरुणीचं अपहरण करण्याचा गुन्हा दाखल केला. त्याचवेळी दिनेश भदोरियावर संशयाच्या भोवऱ्यात होता.

युपीत साधूंच्या हत्येप्रकरणावरून संजय राऊतांनी भाजप नेत्यांचे टोचले कान, म्हणाले

पोलिसांनी मृतदेह विहिरीतून काढला बाहेर

दरम्यान, शेतात काम करणाऱ्या काही शेतकर्‍यांना विहिरीतून वास येऊ लागला. जेव्हा शेतकर्‍यांनी विहिरीत पाहिलं तेव्हा त्यांना मृतदेहाबद्दल माहिती मिळाली. विहिरीतून मृतदेह बाहेर काढल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पोस्टमार्टमसाठी मृतदेह पाठवण्यात आला. तरुणीचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी प्रियकराला ताब्यात घेतलं आणि काटेकोरपणे चौकशी केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रियकराने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांना सांगितलं की 7 एप्रिल रोजी संध्याकाळी तरुणी घरातून पळून गेली आणि प्रियकरालाही पळून जाण्याचा आग्रह धरला. परंतु लॉकडाऊनमुळे दिनेशने घराबाहेर पळून जाण्यास नकार दिला. पण प्रेयसी तरुणीने ऐकलं नाही म्हणून त्याने तिचा गळा आवळून खून केला आणि मित्राच्या मदतीने तिचा मृतदेह विहिरीत फेकून दिला.

स्पेनमध्ये लॉकडाऊन शिथिल, मृत्यूच्या तांडवानंतर स्पेनमधील काही आनंदी PHOTOS

या प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत वर्मा यांचं म्हणणं आहे की, प्रियकर दिनेश भदौरिया आणि त्याचा साथीदार याला अटक करण्यात आली आहे. त्यानं सांगितलं की, अल्पवयीन मुलीची हत्या करणाऱ्या प्रियकराला आणि त्याच्या जोडीदारास कठोर शिक्षा मिळावी यासाठी पोलीस पूर्ण प्रयत्न करतील.

First published: April 28, 2020, 1:33 PM IST

ताज्या बातम्या