मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

उत्तर प्रदेशमध्ये सापडला आफताब सारखा प्रिन्स, प्रेयसीचा खून करून केले 6 तुकडे!

उत्तर प्रदेशमध्ये सापडला आफताब सारखा प्रिन्स, प्रेयसीचा खून करून केले 6 तुकडे!

 धक्कादायक म्हणजे, या हत्याकांडात प्रिन्सचेआई-वडील, बहीण, मामा, मामाचा मुलगा आणि त्याची पत्नी यांचाही या घटनेत सहभाग आहे.

धक्कादायक म्हणजे, या हत्याकांडात प्रिन्सचेआई-वडील, बहीण, मामा, मामाचा मुलगा आणि त्याची पत्नी यांचाही या घटनेत सहभाग आहे.

धक्कादायक म्हणजे, या हत्याकांडात प्रिन्सचेआई-वडील, बहीण, मामा, मामाचा मुलगा आणि त्याची पत्नी यांचाही या घटनेत सहभाग आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Uttar Pradesh, India

आझमगड, 21 नोव्हेंबर : दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडामुळे अवघ्या देश हादरून गेला आहे. ही घटना ताजी असताना आता उत्तर प्रदेशमध्ये आणखी एक अंगावर शहारे आणणारी घटना उघडकीस आली आहे. एका माथेफिरू प्रियकराने प्रेयसीचं दुसऱ्या ठिकाणी लग्न झाल्यानंतर रागाच्या भरात तिची हत्या केली आणि तिच्या मृतदेहाचे सहा तुकडे केले. नंतर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिलं. धक्कादायक म्हणजे, या हत्याकांडात या विकृत प्रियकरासोबत त्याचे कुटुंबीयही सहभागी होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश राज्यातील आझमगड जिल्ह्यातील अहरौला पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. माथेफिरू प्रियकराने आधी प्रेयसीचा गळा दाबून खून केला. नंतर उसाच्या मळ्यात तिच्या मृतदेहाचे सहा तुकडे केले. पोलीस अधीक्षक अनुराग आर्य यांनी सांगितलं की, 16 नोव्हेंबर रोजी गौरी गावात रस्त्याच्या कडेला एका मुलीच्या मृतदेहाचे अनेक तुकडे सापडले होते. मृत मुलगी ही परिसरातील इशकपूर गावातील रहिवासी केदार प्रजापती यांची मुलगी आराधना असल्याचं समोर आलं. या प्रकरणात तपास करून पोलिसांनी हत्येतील मुख्य आरोपी प्रिन्स यादव याला अटक केली आहे. चौकशीत त्याने हत्येचा धक्कादायक घटनाक्रम सांगितला.

(श्रद्धा वालकर हत्याकांड : लहानपणापासूनच रागीट होता आफताब? बालपणीच्या मित्राने केले अनेक खुलासे)

आरोपी प्रिन्स यादवचे आराधनासोबत प्रेमसंबंध जुळले  होते. मात्र आराधनाने दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केल्यामुळे तो संतापला होता. त्यामुळेच त्याने आराधनाला मारण्याचा कट रचला. धक्कादायक म्हणजे,  या हत्याकांडात प्रिन्ससोबत त्याचे कुटुंबीयही सहभागी झाले. त्याचे आई-वडील, बहीण, मामा, मामाचा मुलगा आणि त्याची पत्नी यांचाही या घटनेत सहभाग आहे. या संपूर्ण घटनेदरम्यान प्रिन्सच्या मामाचा मुलगा सर्वेशही त्याच्यासोबत होता. या प्रकरणी 5 महिलांसह आणखी 8 आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत, असं एसपी आर्य यांनी सांगितलं.

मुख्य आरोपी प्रिन्स यादव शारजाहमध्ये लाकूड कापण्याचे काम करतो. त्याचे आराधनासोबत प्रेमसंबंध होते. पण त्याच दरम्यान, फेब्रुवारी 2022 मध्ये तिचे दुसऱ्या व्यक्तीशी लग्न झाल्यावर तो शारजाहहून घरी आला. यानंतर त्याने आराधनाशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला यश आले नाही. त्यामुळे त्याने आराधनाला मारण्याचा कट रचला आणि त्यासाठी त्यानी घरच्यांनाही पटवलं.

(बीड: जमिनीच्या तुकड्यासाठी आई-वडिलांसोबत धक्क्दायक कृत्य; सैन्य दलातील मुलाची हादरवणारी क्रूरता)

9 नोव्हेंबरला तो आराधनाच्या घरी तिला भैरवधामला दर्शनासाठी नेण्यासाठी गेला. तिथून तो तिला एका रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला. त्यानंतर त्याने आराधनाला बळजबरीने तिथून त्याच्या मामाच्या गावातील उसाच्या शेतात नेलं. तिथे प्रिन्स आणि त्याच्या मामाचा मुलगा सर्वेश यांनी तिचा गळा आवळून खून केला. प्रिन्सचे सर्वेशच्या पत्नीसोबतही अफेअर होते. उसाच्या शेतात त्याने आराधनाच्या मृतदेहाचे सहा तुकडे केले आणि नंतर पॉलिथिनमध्ये पॅक केले. काही अंतरावर असलेल्या तलावाजवळ आराधनाचा मृतदेह फेकून दिला. त्यानंतर दोघेही परत आले आणि तिथेच राहिले. पोलिसांनी वैद्यकीय पद्धतीने तपास करून सर्व पुरावे गोळा केले आणि 19 नोव्हेंबरच्या रात्री आरोपी प्रिन्स यादवला अटक केली, अशी माहिती एसपी आर्य यांनी दिली.

First published:

Tags: Crime news, Murder