मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

22 वर्षाच्या तरुणीचं 41 वर्षीय व्यक्तीवर जडलं प्रेम; Love Story चा शेवट झाला अतिशय भयानक

22 वर्षाच्या तरुणीचं 41 वर्षीय व्यक्तीवर जडलं प्रेम; Love Story चा शेवट झाला अतिशय भयानक

22 वर्षीय मॅडी ड्यूरडेंट-होलाम्बी आणि तिच्या  41 वर्षीय बॉयफ्रेंड बेन ग्रीनचा मृतदेह घरातच आढळला. दोघंही बऱ्याच काळापासून सोबत राहत होते

22 वर्षीय मॅडी ड्यूरडेंट-होलाम्बी आणि तिच्या 41 वर्षीय बॉयफ्रेंड बेन ग्रीनचा मृतदेह घरातच आढळला. दोघंही बऱ्याच काळापासून सोबत राहत होते

22 वर्षीय मॅडी ड्यूरडेंट-होलाम्बी आणि तिच्या 41 वर्षीय बॉयफ्रेंड बेन ग्रीनचा मृतदेह घरातच आढळला. दोघंही बऱ्याच काळापासून सोबत राहत होते

  • Published by:  Kiran Pharate

लंडन 01 सप्टेंबर : एका युवतीची तिच्या बॉयफ्रेंडनं केवळ यासाठी हत्या केली (Murder of Girlfriend) कारण तिला त्यांच्यातील नात संपवायचं होतं. गर्लफ्रेडच्या हत्येनंतर आरोपीनं स्वतःही आत्महत्या (Lover Commits Suicide) केली. पोलिसांनी सांगितलं, की 22 वर्षीय मॅडी ड्यूरडेंट-होलाम्बी आणि तिच्या 41 वर्षीय बॉयफ्रेंड बेन ग्रीनचा मृतदेह घरातच आढळला. दोघंही बऱ्याच काळापासून सोबत राहत होते. ही घटना लंडनमधील (London) आहे.

डेली मेलच्या वृत्तानुसार, मार्केटिंग एग्जिक्यूटिव मॅडी आपल्या बॉयफेंडसोबतच्या नात्यात आनंदी नव्हती. त्यांनी याबद्दल आपल्या पालकांना आणि मित्रांना सांगितलं होतं. मॅडीला बॉयफ्रेंड बेन ग्रीनपासून वेगळं व्हायचं होतं. पोलिसांच्या मते याच कारणामुळे नाराज असलेल्या बेननं आधी मॅडीची हत्या केली आणि नंतर स्वतःही जीव दिला. दोघांचेही मृतदेह शुक्रवारी त्यांच्या नॉर्थम्पटनशायरच्या केटरिंग (Kettering, Northamptonshire) येथील घरी आढळले.

‘काळ्या चिमणीची राख’ तिच्यावर टाकणं पडलं भारी; तरुणाचा खिसाच झाला खाली

मॅडीचे 48 वर्षीय वडील स्टीव ड्यूरडेंट-होलाम्बी (Steve Durdant-Hollamby) यांना हे नातं मान्य नव्हतं. कारण बेन ग्रीन आणि मॅडीच्या वयात बरंच अंतर होतं. मात्र, नंतर मुलीच्या आनंदासाठी त्यांनी हे नातं मान्य केलं. स्टीवच्या एका मित्रानं सांगितलं, की मॅडी आणि बेन यांच्यात काहीतरी वाद सुरू होते. मॅडीला त्याच्यापासून वेगळं व्हायचं होतं. कदाचित याच कारणामुळे तिची हत्या करण्यात आली.

गर्लफ्रेंड दुर्लक्ष करत असल्यामुळे केला खून

मॅडीच्या मित्र मैत्रिणींनीही हेच सांगितलं, की दोघांचं नातं संपणार होतं. मॅडी आपल्या बॉयफ्रेंडच्या वागण्याला कंटाळली होती. तो तिला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत होता. या घटनेचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा बरेच दिवस मॅडीचा काहीही फोन आला नाही आणि तिच्या घरच्यांनी पोलिसांकडे मदत मागितली. यानंतर पोलीस मॅडी आणि बेनच्या घरी पोहोचले असता तिथेच दोघांचेही मृतदेह आढळले.

First published:

Tags: Love story, Murder news, Suicide news