मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

प्रेयसीसोबत शारिरीक संबंध, गर्भवती राहिल्यानंतर घेतला हा भयानक निर्णय, पोलीस तपासात खुलासा

प्रेयसीसोबत शारिरीक संबंध, गर्भवती राहिल्यानंतर घेतला हा भयानक निर्णय, पोलीस तपासात खुलासा

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

काही दिवसांपूर्वी मुंब्रा येथील निर्जन डोंगरात एका तरुणीचा मृतदेह आढळून आला होता.

  • Published by:  News18 Desk
ठाणे, 15 ऑगस्ट : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीही मुंब्रा येथे एका तरुणीही हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी आता मोठा खुलासा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणीच्या प्रियकराने तिची हत्या केली आहे. ती गर्भवती होती, त्यामुळे आरोपी प्रियकराने हे धक्कादायक कृत्य केले. काय आहे संपूर्ण प्रकरण - मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी मुंब्रा येथील निर्जन डोंगरात एका तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी कसून तपास केला असता तरुणीचा गळा चिरून खून केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी ठाणे शहर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. यानंतर एका तरुणाला अटक करण्यात आली. या आरोपी तरुणाला आपल्या गरोदर प्रेयसीपासून पिछा सोडवायचा होता. यामुळे त्याने आधी प्रेयसीचा गळा चिरून तिचा खून केला. यानंतर त्याने मृतदेह डोंगरात लपवून ठेवला. आरोपी हा मृताचा मृत तरुणीचा प्रियकर आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तपासात मृत तरुणी गरोदर असल्याचे समोर आले आहे. निर्जन टेकड्यांमध्ये तिचा मृतदेह सापडला होता, तसेच या मृतदेहाची ओळख पटली आहे. अल्तमश मुनोवर दळवी असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. मृत तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. हेही वाचा - वडिलांच्या निधनामुळे नोकरीची गरज, फेसबुक फ्रेंडने दिला धोका अन् तरुणीवर बलात्कार तपास अधिकारी अशोक कडलक यांनी सांगितले की, मुलगी गरोदर राहिल्यानंतर अल्तमश मुनोवर दळवी याने तिच्यापासून सुटका करण्यासाठी निर्जन टेकडीजवळ चाकूने गळा चिरून तिची हत्या केली. यानंतर सुनसान डोंगरात आपल्या प्रेयसीचा मृतदेह लपवून पळ काढला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश करत आरोपीला अटक केली आहे.
First published:

Tags: Crime news, Murder news, Thane

पुढील बातम्या