मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Shocking! गर्लफ्रेंडच्या नवऱ्याला बघून बॉयफ्रेंडची घाबरगुंडी, पाचव्या मजल्यावरून उडी मारल्याने झाला मृत्यू

Shocking! गर्लफ्रेंडच्या नवऱ्याला बघून बॉयफ्रेंडची घाबरगुंडी, पाचव्या मजल्यावरून उडी मारल्याने झाला मृत्यू

आपल्या लग्न झालेल्या गर्लफ्रेंडसोबत राहणारा तरुण तिच्या पतीला समोर पाहून इतका घाबरला, की त्याने थेट पाचव्या मजल्यावरून खाली उडी मारली.

आपल्या लग्न झालेल्या गर्लफ्रेंडसोबत राहणारा तरुण तिच्या पतीला समोर पाहून इतका घाबरला, की त्याने थेट पाचव्या मजल्यावरून खाली उडी मारली.

आपल्या लग्न झालेल्या गर्लफ्रेंडसोबत राहणारा तरुण तिच्या पतीला समोर पाहून इतका घाबरला, की त्याने थेट पाचव्या मजल्यावरून खाली उडी मारली.

जयपूर, 15 डिसेंबर: आपल्या गर्लफ्रेंडचा पती (Husband of girlfriend) घरी आल्याचा पाहून घाबरलेल्या बॉयफ्रेंडनं (Boyfriend) पाचव्या मजल्यावरून (Jumped from fifth floor) थेट खाली उडी मारली. यात गंभीर जखमी झाल्यामुळे त्याचा (Death) मृत्यू झाला. गेल्या दोन वर्षांपासून हे जोडपं एकमेकांसोबत राहत होतं. लग्न झालेल्या गर्लफ्रेंडला तिच्या मित्रानं पळवून शहरात आणलं होतं आणि तिथं एका भाड्याच्या खोलीत दोघं राहत होते. मात्र एक दिवस पत्नीचा शोध घेता घेता पती तिथं पोहोचला आणि बॉयफ्रेंडची घाबरगुंडी उडाली.

विवाहित गर्लफ्रेंडसोबत अफेअर

हीनैनितालमध्ये राहणाऱ्या 24 वर्षांच्या तरुणीचं लग्न झालं होतं. मात्र तरीही तिचं मोहसिन उर्फ आजमसोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. दोघांनी घरातून पळून जाऊन दुसऱ्या शहरात एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. ठरलेल्या योजनेनुसार एक दिवस दोघंही आपापल्या घरातून बाहेर पडले आणि जयपूरला आले. जयपूरमध्ये एका इमारतीत फ्लॅट भाड्यानं घेत दोघं तिथं राहू लागले. तिथं राहणाऱ्या इतर लोकांना हे दोघं पती-पत्नी असल्याचंच वाटत होतं. नैनितालपासून इतक्या दूर, वेगळ्या राज्यात आपल्याला शोधायला कुणी येणार नाही, याबाबत त्यांना खात्री पटली होती. मात्र तरुणीच्या पतीनं आपल्या पत्नीचा शोध सुरूच ठेवला होता.

पतीला पाहून उडाली घाबरगुंडी

आपल्या पत्नीचा माग काढणाऱ्या पतीला तिच्याबाबत माहिती मिळाली होती. ती जयपूरमध्ये एका मित्रासोबत राहत असल्याची माहिती समजल्यानंतर वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी त्याने तिचं घर शोधून तिला भेटायचं ठरवलं. तिचा पत्ता मिळवून तो पत्नीच्या घरी पोहोचला. यावेळी त्याची पत्नी आणि मोहसीन दोघंही घरात होते. डोअर बेल वाजल्यानंतर पत्नीनं दार उघडलं आणि साक्षात आपल्या पतीला समोर पाहून तिला जबर धक्का बसला. मात्र तिच्यापेक्षाही मोहसीनला याचा मोठा धक्का बसला. आपल्या गर्लफ्रेंडच्या पतीला पाहून तो इतका घाबरला की त्याने पाचव्या मजल्यावरून थेट खाली उडी मारली.

हे वाचा -

मोहसीनचा मृत्यू, दोघं फरार

या घटनेनंतर महिलेच्या पतीनं तत्काळ तिथून पळ काढला. तर महिला मोहसीनला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. मात्र तिथं त्याचा मृत्यू झाल्याचं समजल्यावर तीदेखील घाबरली आणि तिनेही तिथून पळ काढला. सध्या पती आणि पत्नी दोघंही फरार आहेत. पोलीस दोघांचाही शोध घेत आहेत.

First published:
top videos

    Tags: Boyfriend, Death, Girlfriend, Wife and husband