मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

नवऱ्याला सोडून माहेरी आली अन् दुसऱ्याच्या प्रेमात घात झाला आणि...

नवऱ्याला सोडून माहेरी आली अन् दुसऱ्याच्या प्रेमात घात झाला आणि...

नवऱ्याशी मतभेद झाल्याने पूजा माहेरी निघून आली होती. माहेरी आल्यानंतर ती आपल्या आईकडे नागभीडला राहत होती.

नवऱ्याशी मतभेद झाल्याने पूजा माहेरी निघून आली होती. माहेरी आल्यानंतर ती आपल्या आईकडे नागभीडला राहत होती.

नवऱ्याशी मतभेद झाल्याने पूजा माहेरी निघून आली होती. माहेरी आल्यानंतर ती आपल्या आईकडे नागभीडला राहत होती.

  • Published by:  sachin Salve
हैदर शेख, प्रतिनिधी चंद्रपूर, 15 ऑगस्ट :  चंद्रपूर (chandrapur) जिल्ह्यातील नागभीड येथील चवडेश्वरी मंदिर परिसरात आपल्या आईसोबत राहणाऱ्या विवाहित तरुणीची प्रियकराने (boyfriend ) घरात घुसून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्या (woman murder) केल्यानंतर प्रियकर पोलीस स्टेशनमध्ये (nagbhid police station) हजर झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागभीड येथील चवडेश्वरी मंदिर परिसरात ही घटना घडली. पूजा रवींद्र सलामे (28) असं मृत महिलेचं नाव आहे.  पूजा सलामे या तरुणीचे लग्न चिखल परसोडी येथील बागडे नामक युवकाशी झालं होतं. लग्न झाल्यानंतर पूजा सासरी गेली होती. काही दिवसांनी सासरी खटके उडू लागले. दोघांमध्ये वाद टोकाला पोहोचला. त्यामुळे नवऱ्याशी मतभेद झाल्याने पूजा माहेरी निघून आली होती.  माहेरी आल्यानंतर ती  आपल्या आईकडे नागभीडला राहत होती. त्याच दरम्यान तिचे संबंध परसोडी येथीलच विवेक ब्रम्हदास चौधरी (25) या तरुणाशी जुळले होते. एक महिन्यांपूर्वी काही कारणावरून दोघांमध्ये भांडण झालं होतं. त्यामुळे दोघे एकमेकांशी बोलत नव्हते.

आता फक्त मासोळ्या पाळण्याचा व्यवसाय करा आणि महिन्याला कमवा तब्बल 2 लाख रुपये

आज विवेक ब्रम्हदास चौधरी (25) हा सकाळी पूजाला भेटायला आला होती. यावेळी पूजाची आई बाहेर गेली होती. नेमकी हीच संधी साधून आरोपीने पूजाच्या गळ्यावर सपासप धारधार शस्त्राने वार केले. चाकूने सपासप वार केल्यामुळे पूजा रक्त्याच्या थारोळ्यात पडली. त्यामुळे काही वेळाने पूजाचा जागीच मृत्यू झाला. Pune : लग्नसमारंभात जास्त हळद लावण्यावरुन पती-पत्नीमध्ये वाद; एकाचा गेला जीव पूजाची हत्या केल्यानंतर आरोपी विवेक चौधरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला आणि पूजाचा खून केल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. तरुणाचे मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे रवाना केले आहे. या घटनेचा अधिक तपास नागभीड पोलीस करत आहेत.
First published:

Tags: Chandrapur

पुढील बातम्या