Home /News /crime /

'चिकन बेचव झालंय'; मामाचे हे शब्द ऐकताच भाच्याचा चढला पारा, निर्घृण हत्या

'चिकन बेचव झालंय'; मामाचे हे शब्द ऐकताच भाच्याचा चढला पारा, निर्घृण हत्या

मामनं भाच्याच घरात बनवण्यात आलेलं चिकन (Chicken) हे चांगलं झालं नसल्याचं म्हटल्यानं भाच्यानं टोकाचं पाऊल उचललं आहे. भाच्यानं आपल्या मामावर जबरदस्त वार करत त्याची हत्या (Murder) केली.

    लखनऊ 15 मे : हत्येच्या अनेक घटना दररोज समोर येत असतात. मात्र, यातील काही घटना सर्वांनाच चक्रावून सोडणाऱ्या असतात. अशीच एक घटना आता समोर आली असून यात भाच्यानंच आपल्या मामाची हत्या (Murder) केली आहे. या हत्येचं कारण ऐकून तुम्हीदेखील हैराण व्हाल. मामनं भाच्याच घरात बनवण्यात आलेलं चिकन (Chicken) हे चांगलं झालं नसल्याचं म्हटल्यानं भाच्यानं टोकाचं पाऊल उचललं आहे. आधी दोघांमध्ये याच कारणावरुन वाद झाला. हा वाद काहीच वेळात हाणामारीत बदलला. यानंतर भाच्यानं आपल्या मामावर जबरदस्त वार करत त्याची हत्या केली. ही घटना उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरीच्या (Lakhimpur Kheri) लंदनपुरवा गावातील आहे. मंगलदीप यानं आपल्याच गावात राहणाऱ्या छोटेलाल या मामाला घरी जेवणासाठी आणि दारु पार्टीसाठी घरी बोलावलं होतं. दोघांनी आधी भरपूर दारु पिली आणि नंतर चिकन खाण्यास सुरुवात केली. यादरम्यान मामानं भाच्याला म्हटलं, की तू बनवलेला कोंबडा अजिबातही चांगला झालेला नाही. याच गोष्टीवरुन दोघांमध्ये वाद झाला. या वादादरम्यान मामानं आपल्या भाच्याला मारलं. यामुळे राग अनावर झालेल्या मंगलदीपनं आपल्या मामावर जबरदस्त वार करत त्याची हत्या केली. या हल्ल्यात जखमी झालेल्या मामाला ताबडतोबत रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. मात्र, अधिक रक्तस्त्राव झाल्यानं छोटेलालचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला. या घटनेची माहिती गावात पसरताच एकच खळबळ उडाली. लोकांनी पोलिसांनी या घटनेची माहिती देताच, पोलिसांनी आरोपी मंगलदीपला अटक केली. पोलीस अधिक्षक विजय ढूल यांचं असं म्हणणं आहे, की दोघंही मामा-भाचे एकमेकांचे खूप खास होते. ते एकमेकांसोबत अगदी मित्राप्रमाणेच वागत असत. याच कारणामुळे मंगलदीपनं मामाला जेवणासाठी बोलावलं होतं. याच दरम्यान दोघांमध्ये वाद झाला आणि मारहाणीत जबरदस्त मार लागल्यानं छोटेलालचा मृत्यू झाला. आरोपीला अटक करण्यात आली आहे. छोटेलालच्या नातेवाईकानं सांगितलं, की जेवण करतानाच दोघांमध्ये कोणत्या तरी कारणावरुन वाद झाला. यातूनच भाच्यानं मामाची हत्या केली.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Chicken, Crime news, Murder

    पुढील बातम्या