मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /धुळवडीसाठी आजीच्या घरी आला होता चिमुरडा; मामाने फिरायला बाहेर नेलं, अन्...

धुळवडीसाठी आजीच्या घरी आला होता चिमुरडा; मामाने फिरायला बाहेर नेलं, अन्...

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

मामा धुळवड खेळण्यासाठी 5 वर्षांच्या भाच्याला बाहेर घेऊन गेला आणि...

नवादा, 18 मार्च : बिहारमधील (Bihar News) नवादा जिल्ह्यात 5 वर्षांच्या मुलाची हत्या (Murder) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना शाहपूर पोलीस ठाणे हद्दीतील जगदीशपूर गावातील आहे. येथे एक महिला आपल्या माहेरी होळी (Holi 2022) साजरी करण्यासाठी आली होती. दरम्यान मामा धुळवड खेळण्यासाठी भाच्याला बाहेर घेऊन गेला आणि त्याचा गळा दाबून हत्या केली.

कुटुंबीयांनी सांगितलं की,  5 वर्षीय राकेश कुमार होळीसाठी आपल्या आजीच्या घरी आला होता. यादरम्यान त्याचा माना रंजय कुमार त्याला फिरवण्यासाठी बाहेर घेऊन गेला. मात्र बराच वेळ झाला तरी तो परतला नाही. म्हणून कुुटुंबाने चिंता व्यक्त केली.

गव्हाच्या शेतात मिळाला मृतदेह...

मामा भाच्याला घेऊन बराच वेळ आला नाही तर कुटुंबीयांनी तपास सुरू केला. यादरम्यान त्यांना गव्हाच्या शेतात मृतदेह सापडला. जेव्हा कुटुंबीयांनी मामाला विचारलं तर त्याने सांगितलं की, भाच्याची हत्या केली. या घटनेची माहिती शाहपूर पोलिसांना देण्यात आली. ज्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करीत आरोपीला अटक केली.

हे ही वाचा-लग्नाचं वचन देऊन तरुणीला घातला 22 लाखाला गंडा; पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ

हत्येचं कारण अद्याप स्पष्ट नाही...

अद्यापही हत्येचं कारण स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी मृतदेह आपल्या ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवला. मुलाच्या मृत्यूनंतर घरात शोककळा पसरली आहे. होळीच्या आनंदावर विरजण पडलं आहे. मुलगा बाढ जिल्ह्यातील राहणारा होता आणि होळीत आपल्या आजीच्या घरी आला होता.

First published:

Tags: Bihar, Crime news