मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /धक्कादायक! गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्याचा राक्षसी आनंद; पार्टीमध्ये पिस्तूल घेऊन आला अन्...

धक्कादायक! गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्याचा राक्षसी आनंद; पार्टीमध्ये पिस्तूल घेऊन आला अन्...

जन्मदिवस, लग्नाचा वाढदिवस, निरोप समारंभ अशा अनेक प्रकारच्या कार्यक्रमात केक कापला जातो आणि तो कार्यक्रम साजरा केला जातो. मात्र, बिहारमधून एका गर्लफ्रेंडसोबत झालेल्या ब्रेकअपनंतर केक कापून सेलिब्रेशन करण्यात आले आहे.

पाटणा, 14 ऑगस्ट : बिहारमधील एका ब्रेकअप पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पार्टीत शस्त्रांचे प्रदर्शन केले गेले. तसेच केकसुद्धा चाकूऐवजी पिस्तुलाने कापला गेला. या पार्टीचे फोटोही व्हायरल झाले आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

जन्मदिवस, लग्नाचा वाढदिवस, निरोप समारंभ अशा अनेक प्रकारच्या कार्यक्रमात केक कापला जातो आणि तो कार्यक्रम साजरा केला जातो. मात्र, बिहारमधून एका गर्लफ्रेंडसोबत झालेल्या ब्रेकअपनंतर केक कापून सेलिब्रेशन करण्यात आले आहे. पण या ब्रेकअप पार्टीत सर्वात खास गोष्ट म्हणजे यावेळी तरुणांच्या ग्रुपने जो केक कापला, त्यात चाकूऐवजी पिस्तूलचा वापर करण्यात आला. तसेच शस्त्रांचे जोरदार प्रदर्शन करण्यात आले. समस्तीपूरमधील या अनोख्या ब्रेकअप पार्टीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ब्रेकअप नंतर पार्टीचे आयोजन

ब्रेकअप नंतर पार्टीचे आयोजन

या फोटोंमध्ये तरुणांच्या ग्रुपने एका शांततेच्या ठिकाणी एका पार्टीचे आयोजन केल्याचे दिसत आहे. तसेच या पार्टीत शस्त्रांचाही वापर करण्यात आला. ही घटना समस्तीपूर जिल्ह्यातील विद्यापतीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील मणियारपूर गावातली आहे. प्रेयसीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तरुणाने चांगली सजावट करून पार्टी बोलावली होती आणि जल्लोष साजरा केला होता, त्यादरम्यान डीजेच्या तालावर गाणी लावून नाजगाणेही झाले. याठिकाणी पार्टीत लायटिंगचीही व्यवस्था करण्यात आली होती आणि संपूर्ण कार्यक्रम ड्रोन कॅमेऱ्यानेही कव्हर करण्यात आला होता. तसेच पार्टीत मित्रांसाठी खाण्यापिण्याचीही व्यवस्था होती.

हेही वाचा - विधवा आईचे प्रेमसंबंध असल्याचा संशय, पोटच्या मुलाने केलं संतापजनक कृत्य

ब्रेकअप पार्टीतील केक

ब्रेकअप पार्टीतील केक

ही घटना कधी घडली, याला दुजोरा मिळालेला नाही. मात्र, ही बाब मणियारपूर गावातील असल्याची माहिती आहे. पार्टी केकवर अमित आणि निशाचा ब्रेकअप डे लिहिला होता. पार्टीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर पार्टी कोणत्याही उत्सवावर असली तरी त्यात शस्त्रांचे प्रदर्शन कितपत योग्य आहे, असा प्रश्न याठिकाणी अनेकांनी उपस्थित केला आहे. पोलिसांनी या घटनेच्या तपासाला सुरुवात केली असून ही पार्टी कोणी आयोजित केली होती याचा शोध घेतला जात आहे.

First published:

Tags: Bihar, Crime news