मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

18 वर्षांचा तरुण अन् महिला 48; प्रेम प्रकरण जुळलं अन् लेकीचा केला भयंकर शेवट!

18 वर्षांचा तरुण अन् महिला 48; प्रेम प्रकरण जुळलं अन् लेकीचा केला भयंकर शेवट!

काही दिवसांपूर्वी महिलेच्या पतीचा मृत्यू झाला होता.

काही दिवसांपूर्वी महिलेच्या पतीचा मृत्यू झाला होता.

काही दिवसांपूर्वी महिलेच्या पतीचा मृत्यू झाला होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Meenal Gangurde

दिल्ली, 25 ऑगस्ट : दिल्लीच्या टीकरी बॉर्डर भागातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 18 वर्षांचा तरुण आणि 48 वर्षांची महिला यांच्यातील प्रेमसंबंधात एका मुलीचा जीव गेला. ही घटना संताप वाढवणारी आहे. या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला तिची आई आणि 18 वर्षीय आरोपी हरीश यांच्यातील मैत्री आवडत नव्हती. तिने अनेकदा याचा विरोधही केला होता.

शेवटी याला संतापून आरोपी हरीशने मुलीला आपल्या वाटेतून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. यापूर्वीच पीडितेच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी साधारण 1 वाजाता पोलिसांना एक कॉल आला. यामध्ये एका तरुणाने अल्पवयीन मुलीची चाकूने गळा कापल्याचं सांगण्यात आलं. तेथील काहींनी आरोपीला पकडून ठेवलं.

Murder in Jalgaon : जळगावात हत्यासत्र सुरूच, मागच्या चार दिवसात जिल्ह्यात तीन खून

पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि मुलीला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेलं. येथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोलिसांनी या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला ताब्यात घेतलं आहे. आरोपी हरीश आणि मृत मुलीच्या आईमध्ये प्रेम प्रकरण सुरू होतं. हे तिघेही जण एकाच घरात राहत होते. शिवाय हरीश आणि महिला एकाच कंपनीत काम करीत होते. हे सर्व महिलेच्या अल्पवयीन मुलीला आवडत नव्हतं. तिला अनेकदा याचा विरोधही केला होता. शेवटी हरीशने मुलीवरच डाव साधला आणि अत्यंत क्रूरपणे तिची हत्या केली.

First published:

Tags: Crime news, Love, Murder