मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

बाउन्सरने मारहाण करून कपडे फाडले अन्..; महिलेचा गंभीर आरोप, क्लबमधील घटनेनं खळबळ

बाउन्सरने मारहाण करून कपडे फाडले अन्..; महिलेचा गंभीर आरोप, क्लबमधील घटनेनं खळबळ

फाईल फोटो

फाईल फोटो

एका महिलेनं आरोप केला आहे की क्लबमध्ये प्रवेश करण्यावरून काहीतरी वाद झाला, ज्यानंतर दोन बाऊन्सरने तिच्यासोबत गैरवर्तन केलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 25 सप्टेंबर : दिल्लीच्या साऊथ एक्स्टेंशनमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेनं आरोप केला आहे की क्लबमध्ये प्रवेश करण्यावरून काहीतरी वाद झाला, ज्यानंतर दोन बाऊन्सरने तिच्यासोबत गैरवर्तन केलं. महिलेच्या आरोपानुसार, बाउन्सर आणि मॅनेजरने तिचे कपडे फाडले. याशिवाय त्यांनी तिला मारहाणही केली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

'गुड मॉर्निंग सर' म्हटले म्हणून शिक्षकाने 40 विद्यार्थ्यांना केली बेदम मारहाण, बीडमधील संतापजनक घटना

18 सप्टेंबर रोजी कोटला मुबारकपूर पोलीस स्टेशनमध्ये रात्री 2.14 वाजता एक पीसीआर कॉल आला होता, ज्यामध्ये क्लबच्या बाउन्सरने 'द कोड' क्लबमध्ये एका महिलेसोबत गैरवर्तन केल्याची आणि कपडे फाडल्याची तक्रार नोंदवली होती. जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा पीसीआर कॉलरचे कपडे अस्ताव्यस्त पडले होते आणि चौकशीत तिने सांगितलं की तिचे कपडे दोन बाउन्सर आणि क्लबच्या व्यवस्थापकाने फाडले आहेत.

पीडितेने पुढे सांगितलं की, तिला शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. तिला अयोग्य पद्धतीने स्पर्शही करण्यात आल्याचा आरोप महिलेनं केला आहे. त्यानंतर महिलेला एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं. तक्रारदार महिलेनं पोलिसांना सांगितलं की ती तिच्या मैत्रिणींसोबत एका पार्टीसाठी क्लबमध्ये आली होती, तिथे प्रवेशावरून त्यांच्यात वाद झाला आणि बाऊन्सर्स आक्रमक झाले. त्यांनी तिला आणि तिच्या मित्रांना मारहाण केली.

तोल गेला अन् मावळातील विसापूर किल्ल्यावरुन दरीत कोसळला वाटसरू; पुढे काय घडलं पाहा, VIDEO

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या तक्रारीवरून तिच्यावर अत्याचार झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिचे कपडे फाडले गेले आणि साऊथ एक्स्टेंशनमधील एका खासगी क्लबच्या दोन बाऊन्सरने तिला अयोग्यरित्या स्पर्श केला. आरोपानुसार, क्लबमध्ये प्रवेश करण्यावरून झालेल्या वादानंतर हे घडलं.

या घटनेमागील सत्य जाणून घेण्यासाठी क्लब आणि जवळपासच्या इतर शोरूमचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत. याशिवाय क्लबकडून बाऊन्सर्सचा तपशीलही घेण्यात आला असून खऱ्या गुन्हेगारांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

First published:

Tags: Crime news