मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

OMG : दुकानातून ब्लेड खरेदी केलं, स्वत:च कापला प्रायव्हेट पार्ट; 5 बहिणींमधील भावाचं विचित्र कृत्य

OMG : दुकानातून ब्लेड खरेदी केलं, स्वत:च कापला प्रायव्हेट पार्ट; 5 बहिणींमधील भावाचं विचित्र कृत्य

या तरुणाने आपल्याच हाताने स्वत:चा प्रायवेट पार्ट कापल्याने कुटुंबात खळबळ उडाली आहे.

या तरुणाने आपल्याच हाताने स्वत:चा प्रायवेट पार्ट कापल्याने कुटुंबात खळबळ उडाली आहे.

या तरुणाने आपल्याच हाताने स्वत:चा प्रायवेट पार्ट कापल्याने कुटुंबात खळबळ उडाली आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

पश्चिमी चंपारण, 30 नोव्हेंबर : बिहारमधील (Bihar News) बेतिया भागातील एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथे एका तरुणाने स्वत:च्याच हाताने आपला प्रायव्हेट पार्ट (Private Part) कापला. ज्यानंतर त्याला जीएमसीएचमध्ये दाखल करण्यात आलं. तरुणाचं नाव इरफान शेख असून तो काला बरवा गावातील राहणारा आहे. तरुणाने सांगितलं की, त्याने दुकानातून ब्लेड खरेदी केलं आणि स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला. (bought a blade from the shop cut his own private part Strange act of brother among 5 sisters)

त्याने असं का केलं, याबद्दल मात्र तो नेमकं काहीही सांगत नाही. तर कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, इरफानशिवाय त्यांना पाच मुली आहेत. आणि पक्क घऱदेखील बांधलेलं नाही. त्यामुळे इरफानचं लग्न करीत नव्हतो. यादरम्यान इरफानने असं धक्कादायक कृत्य केलं. यानंतर कुटुंबीयांना जबर धक्का बसला. मिळालेल्या माहितीनुसार, इरफान पोखरामध्ये मजुरीचं काम करीत होता. दोन दिवसांपूर्वी त्याने वडिलांना फोन करून घरी येत असल्याचं सांगितलं. मात्र एक दिवसांपूर्वीच नेपाळ पोलिसांनी फोन करून मुलगा जखमी असल्याचं सांगितलं. यानंतर कुटुंबीय रुग्णालयात पोहोचले. मात्र तोपर्यंत इरफान तेथून पळून गेला होता. यानंतर कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. यादरम्यान भारत-नेपाळ सीमेजवळ इरफान सापडला, त्याला घेऊन वडील बेतिया येथे पोहोचले आणि त्याला जीएमसीएचमध्ये दाखल केलं.

हे ही वाचा-मित्रानेच काढला मित्राचा काटा; जमिनीवर डोकं आपटून दिला भयंकर मृत्यू

इरफानने सांगितलं की, अचानक असं काहीतरी डोक्यात आलं. म्हणून दुकानात जाऊन ब्लेड खरेदी केलं आणि आपल्या हातानेच स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापून टाकला. तर दुसरीकडे इरफानच्या आईने सांगितलं की, पाच मुली असल्या कारणाने त्याचं लग्न करणं कठीण झालं होतं. सध्या रुग्णालयात इरफानवर उपचार सुरू आहे, डॉक्टर त्याच्यावर शस्त्रक्रिया करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

First published:

Tags: Bihar, Crime, PRIVATE part