उत्तर प्रदेश, 6 सप्टेंबर : बलियामध्ये एक हैराण (Shocking News) करणारं वृत्त समोर आलं आहे. येथे 9 वर्षांच्या एका मुलगा आणि त्याच्या मित्राने पहिल्यांदा यू-ट्यूबवरुन (You-Tube) गोळी कशी चालवायची हे शिकले. यानंतर खेळत असताना वडिलांची पिस्तुल घेऊन एक दुसऱ्यावर फायर केलं. आणि मित्राला गोळी लागल्यानंतर तेथून पळ काढला. मित्राची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्याला बीएचयू रेफर करण्यात आलं आहे. पोलिसांकडून मुलगा व त्याच्या वडिलांची चौकशी सुरू आहे. (oth learned firing from YouTube fathers pistol fired one shot after another at the friend)
अभ्यासासाठी थांबला होता मित्राच्या घरी
ही घटना जिल्हा कारागारजवळील आहे. टागोर नगर येथे राहणारा 12 वर्षीय आदित्य मिश्रा हा नववीचा विद्यार्थी आहे. रविवारी रात्री तो आपला मित्र अभिषेक सिंहला भेटायला त्याच्या घरी गेला होता. सांगितलं जात आहे की. दोघे नातेवाईकदेखील आहेत. यासाठी अभ्यास करण्यासाठी अभिषेत रात्री आदित्यच्या घरीच थांबला. यादरम्यान अभिषेक घरातील वडिलांची लायसेन्स पिस्तुल घेऊन आला. दोघांनी पिस्तुलातून गोळी झाडण्याची पद्धत यूृ-ट्यूबवर पाहिली. यानंतर दोन्ही मित्रांमध्ये ठरलं की, आपण एकमेकांवर गोळी चालवू. त्यावेळी अभिषेकने वडिलांच्या पिस्तुलाने मित्र आदित्यवर फायर केलं. एका मागून एक असं करीत दोन वेळा त्याने आदित्यवर फायर केलं. त्याच्या दोन्ही पायांना एक एक गोळी लागली. ज्यानंतर तो तेथेच कोसळला आणि ओरडू लागला. आदित्यच्या पायातून रक्त येत असल्याचं पाहून अभिषेक घाबरला आणि तेथून पळाला.
हे ही वाचा-जमिनीच्या तुकड्यासाठी जन्मदात्या आईचा भयावह अंत; अंगावर काटा उभा राहील
आदित्यच्या आवाजाने कुटुंबीय धावत त्याच्या जवळ आले. कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. प्रकृती गंभीर असल्या कारणाने डॉक्टरांनी आदित्यला बीएचयू मेडिकल कॉलेजमध्ये हलवलं. येथे सूचना मिळाल्यानंतर पोलीस पोहोचली. पोलिसांनी अभिषेकच्या कुटुंबाची चौकशी करीत आहे. मात्र कोणीच नीट उत्तर देत नसल्याचं समोर येत आहे. घटनेच्या 16 तासांनंतरही आदित्यच्या कुटुंबीयांनी कोणतीही तक्रार दाखल केली नाही.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.