मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीत बॉम्ब ठेवल्याने खळबळ! घटनेने राज्य हादरलं, CCTV फुटेज समोर

पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीत बॉम्ब ठेवल्याने खळबळ! घटनेने राज्य हादरलं, CCTV फुटेज समोर

काही दिवसांपूर्वी गायक सिद्धू मुसेवाला याची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. आता थेट पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीत बॉम्ब ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना पंजबामध्ये घडली आहे.

  • Published by:  Rahul Punde
अमृतसर, 16 ऑगस्ट : काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला याची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात मोठमोठे गुन्हेगार पकडण्यात आले आहे. अजूनही या घटनेचा तपास सुरू आहे. अशा परिस्थितीत पंजाबच्या अमृतसरमधून मोठी बातमी समोर येत आहे. रणजीत अॅव्हेन्यू सी ब्लॉक येथे पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीत बॉम्ब टाकून दोन मास्कधारी तरुण घटनास्थळावरून फरार झाले आहेत. सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. अमृतसरच्या एका पॉश निवासी भागात सुरक्षेबाबत मोठा निष्काळजीपणा पाहायला मिळाला आहे. सध्या कोणताही पोलीस अधिकारी यावर बोलायला तयार नाही. सीसीटीवी फुटेजचा पोलिसांकडून तपास पोलिसांचे मोठे पथक रणजीत अॅव्हेन्यूमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत असून, मोटारसायकलवर बॉम्ब ठेवण्यासाठी आलेले दोन तरुण कोठून आले. कुठे फरार झाले, याचाही पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. या दोन मास्क लावलेल्या तरुणांनी सुरक्षेबाबत पोलिसांच्या कामगिरीवर मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. त्या मोटारसायकल क्रमांकावरूनही पोलीस तरुणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, अद्यापपर्यंत पोलीस अधिकाऱ्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

वाचा - पतीचा राग पोटच्या मुलींवर काढला; 3 लेंकींना विष देऊन आईने घेतला क्रूर बदला

गुन्हेगारांचे थेट पोलिसांनाच आव्हान काही दिवसांपूर्वी पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची 29 मे रोजी मानसा जिल्ह्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यांचे खरे नाव शुभदीप सिंग सिद्धू होते. लॉरेन्स-बिश्नोई टोळीचा सदस्य असलेल्या कॅनडास्थित गोल्डी बराडने सिद्धूच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. सिद्धूची हत्या करणाऱ्या सहा शूटर्सपैकी तीन जणांना अटक करण्यात आली आहे, दोघांना गोळ्या घालून ठार करण्यात आले आहे, तर एक जण अजूनही फरार आहे. अशात पोलीस निरीक्षकांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या गाडीत बॉम्ब ठेवणे म्हणजे थेट पोलिसांनाच आव्हान आहे.
First published:

Tags: Crime, Punjab

पुढील बातम्या