मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /अजब चोरी! डब्यात भरलं पीठ, घातली मुलाच्या मृत्यूची भीती; लुटले दागिने आणि पैसे

अजब चोरी! डब्यात भरलं पीठ, घातली मुलाच्या मृत्यूची भीती; लुटले दागिने आणि पैसे

आपण ज्योतिषी असल्याचं सांगत एका महिलेनं डोळ्यांदेखत चोरी केल्याचं उघड झालं आहे. जेव्हा ही बाब लक्षात आली तेव्हा फारच उशीर झाला होता.

आपण ज्योतिषी असल्याचं सांगत एका महिलेनं डोळ्यांदेखत चोरी केल्याचं उघड झालं आहे. जेव्हा ही बाब लक्षात आली तेव्हा फारच उशीर झाला होता.

आपण ज्योतिषी असल्याचं सांगत एका महिलेनं डोळ्यांदेखत चोरी केल्याचं उघड झालं आहे. जेव्हा ही बाब लक्षात आली तेव्हा फारच उशीर झाला होता.

रायपूर, 10 जानेवारी: आपण ज्योतिषी (Astrologer) आणि मांत्रिक असल्याचं भासवत एका महिलेनं (Woman) दुसऱ्या महिलेचे दागिने आणि पैसे (Jewellery and Money) लुटल्याची (Theft) धक्कादायक घटना समोर आली आहे. अचानक घरात घुसलेल्या या चोरट्या भोंदू महिलेनं आपल्या बडबडीनं घरातील महिलेच्या मेंदूचा ताबा घेतला आणि तिला स्वतःच्या आदेशांवर नाचायला भाग पाडलं. ही महिला भोंदू आहे, हे जेव्हा महिलेच्या लक्षात आलं, तेव्हा फार उशीर झाला होता. काहीही ओळख नसताना अचानकपणे घरात घुसून या महिलेनं डाव साधला. 

अशी घडली घटना

छत्तीसगडमधल्या रायपूर भागात राहणाऱ्या मुमताज बेगम दानी यांच्या घरात दुपारी 2 वाजण्याच्या सुमाराला अचानक एका महिलेनं दरवाजा ठोठावला. मुमताज यांनी दार किलकिलं करून पाहिलं, तर बाहेर एक महिला होती. स्वतःच दार ढकलून ही महिला आत आली आणि थेट घराच्या हॉलमध्ये येऊन बसली. आजूबाजूला पाहत आणि काहीतरी हुंगल्याचं नाटक करत तुझ्या घरावर भीषण संकट घोंगावत असल्याचा आपल्याला वास येत असल्याचा अभिनय तिनं केला. 

अगोदच काढली होती माहिती

कुटुंबाची अगोदरच जुजबी माहिती काढून आलेल्या या महिलेनं काही गोष्टी मुमताजला सांगितल्या. तुला दोन मुलं असून धाकटा मुलगा सध्या त्रास देत असल्याचं महिलेनं सांगताच तिच्याकडे काहीतरी अद्भुत शक्ती असल्याचा विश्वास मुमताजला वाटू लागला. या संकटातून केवळ आपणच तुझी सुटका करू शकतो, असं सांगत तिने मुमताज घरातून गव्हाचं पीठ आणि पाणी घेऊन यायला सांगितलं. त्यासोबत एक डबाही तिने मागवला.

डब्यात भरली कणीक

मुमताजसमोर महिलेनं कणीक मळली आणि ती एका डब्यात भरली. त्यानंतर घरात जेवढे काही दागिने आणि पैसे असतील, ते एका पिशवीत बांधून आणायला महिलेला सांगितलं. महिलेनं 4 मंगळसूत्रं, इतर दागिने आणि रोख 5 हजार रुपये एका पिशवीत बांधून आणले. त्यानंतर हे डबे बांधण्यासाठी पाच ओढण्या घेऊन यायला सांगितलं. महिलेनं दिलेल्या ओढण्यांनी तो डबा तिने बांधला. मग आपल्याला वरण-भात हवा असल्याचं सांगत महिलेला आत पिटाळलं. 

हे वाचा -

महिलेला घातली भीती

वरण- भात खाल्ल्यावर महिलेनं मुमताजकडे तो डबा सोपवला आणि पुढचे 11 दिवस तो न उघडण्याची तंबी तिला दिली. डबा उघडला तर मुलाच्या जिवाला धोका निर्माण होईल, अशी तंबी तिला दिली. महिलेनं जेव्हा 11 दिवसांनी डबा उघडला, तेव्हा त्यातील दागिने आणि पेैसे गायब असल्याचं तिच्या लक्षात आलं. 

पोलीस तपास सुरू

मुमताजनं ही बाब घरच्यांना सांगितल्यावर त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. चोरीचा हा वेगळाच प्रकार यानिमित्तानं समोर आला आहे.

First published:

Tags: Crime, Financial fraud, Money, Thief, Woman