मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

OYO हॉटेलमध्ये 'ती'ला सोडून तरुण निघून गेला, रुम उघडली तर बसला धक्का

OYO हॉटेलमध्ये 'ती'ला सोडून तरुण निघून गेला, रुम उघडली तर बसला धक्का

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

या धक्कादायक घटनेमुळे हॉटेलमधील स्टाफसह पोलिसही चक्रावून गेले आहेत.

झारखंड, 21 सप्टेंबर :  देशात ओयो हॉटेल्सची (OYO Hotels) संख्या बरीच मोठी आहे. सुरुवातीला अगदी काही मोजक्याच शहरांमध्ये असलेली ही सुविधा हल्ली अनेक छोट्या शहरांमध्येही सुरू झाली आहे. ओयो अॅपवरून बुकिंग करून कुणीही या हॉटेल्समध्ये थांबू शकतं. बऱ्याच ठिकाणी प्रेमी युगुलं वेळ घालवण्यासाठी ओयोचा पर्याय निवडतात. मात्र, झारखंडमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. हॉटेलमध्ये एका  24 वर्षीय महिलेचा मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडालीआहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  झारखंडमधील जमशेदपूर भागात हा प्रकरा घडला आहे. ज्या लॉजमध्ये ही घटना घडली ते आदित्यपूर (Aadityapur) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरआयटी भागात असून, त्याचे नाव शुभेक्षा लॉज आहे. लॉजच्या 101 नंबरच्या खोलीतून या तरुणीचा मृतदेह सापडला आहे. घटनेची माहिती मिळताच आदित्यपूर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला.
मृत महिला जमशेदपूर येथील गालुडीह येथील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. कांती देवी असं या महिलेचं नाव आहे. महत्त्वाचं म्हणजे हे लॉज ओयोद्वारे चालवलं जातं, ज्यामध्ये बाहेरील प्रेमी युगुलांना येऊन थांबण्याची परवानगी आहे.
दरम्यान, ही महिला कोलकाता  येथील एका तरुणाबरोबर इथं आली होती, असं म्हटलं जातंय. या घटनेनंतर तरुण घटनास्थळावरून फरार झाला आहे.
तसंच पोलिसांनी तपासादरम्यान घटनास्थळावरून अनेक वस्तू जप्त केल्या आहेत. याबाबत हॉटेलचे मॅनेजर दिलीप घोष कॅमेरा पाहून लपू लागले. पण त्यांनी माहिती दिली ते म्हणाले, ‘ही घटना घडली त्या दिवशी दुपारी तो तरुण आणि ही मृत महिला रुम घेण्यासाठी आले होते. दोघेही रुममध्ये गेले आणि काही वेळाने तो तरुण बाहेर जेवण आणायला गेला. पण बराच वेळ झाला तरी तो परत आला नाही. हॉटेल सोडून पळून गेला. त्यानंतर रुम बघितली असता या महिलेचा मृतदेह आढळला.’
या धक्कादायक घटनेमुळे हॉटेलमधील स्टाफसह पोलिसही चक्रावून गेले आहेत. या महिलेचा खून करणारा हा तरुण तिचा प्रियकर होता की कोण होता, याबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. सध्या पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. मॅनेजरने दिलेल्या प्राथमिक माहितीवरून पोलीस तपास करत फरार झालेल्या तरुणाचा शोध घेत आहेत.
First published:

Tags: Crime news

पुढील बातम्या