Home /News /crime /

नागपूर हादरलं, रस्त्याच्या बाजूला आढळले दोन तरुणांचे मृतदेह

नागपूर हादरलं, रस्त्याच्या बाजूला आढळले दोन तरुणांचे मृतदेह

मागील आठवड्यात एमआयडीसी, प्रतापनगर आणि हिंगणा परिसरासह जिल्ह्यात हत्येच्या एकूण 7 घटना घडल्या आहेत.

    नागपूर, 16 नोव्हेंबर : देशाची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये (Nagpur) ऐन दिवाळीच्या सणातही गुन्हेगारीच्या घटनांनी डोके वार काढले आहे. गेल्या 24 तासात 3 हत्याच्या (Murder) घटना घडल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. नागपूरमध्ये दोन युवकाची पाचगाव कुही रोड येथील डोंगरगावाजवळ हत्या करून मृतदेह फेकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पाचगावपासून कुहीच्या दिशेनं 2 किलोमीटर अंतरावर आज सकाळी रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात दोन तरुणाचे मृतदेह आढळून आले होते. स्थानिकांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. वडिलांशी पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, मुलानंच पित्याची केली निर्घृण हत्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेतली. दोन्ही तरुणांना धारदार शस्त्राने ठार मारण्यात आले होते. कुणाल ठाकरे (राहणार, नरसाला) आणि सुशील बावणे (राऊत नगर, दिघोरी) अशी मृतांची ओळख पटली आहे. हे दोन्ही तरुण कुख्यात ठवकर टोळीचे सदस्य असल्याचे समोर आले आहे. गँगवार मधून ही घटना घडली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या दोन्ही तरुणांची इतरत्र हत्या करून  पाचगाव जवळ आणून फेकल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपींचा शोध सुरू आहे. ‘तुम्ही शूटिंगला गेला आहात असंच वाटतं’ इरफान खानच्या मुलाची भावनिक पोस्ट दरम्यान, रविवारी कपिल नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील उप्पलवाडी परिसरात एक वृद्ध चौकीदाराची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी सकाळी दोन तरुणांची हत्या करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. मागील आठवड्यात एमआयडीसी, प्रतापनगर आणि हिंगणा परिसरासह जिल्ह्यात हत्येच्या एकूण 7  घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नाशिकमध्ये तरुणाची कोयत्याने वार करून हत्या नाशिकमधील देवळाली गाव परिसरात एका तरुणाची कोयत्याने सपासप वार करून हत्या करण्यात आल्याची अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. नाशिक रोड देवळाली दर्गा जवळील खोडदे चौकात रविवारी रात्री ही घटना घडली.  योगेश चायल असं मृत तरुणाचे नाव आहे. मंदिरं उघडण्याच्या श्रेयवादावरून अमोल कोल्हेंचा भाजप नेत्यांना सणसणीत टोला खोडदे चौकात राहणारे स्थानिक लोकं आणि काही मुलं हे रस्त्यावर फटाके फोडत होती. योगेश चायल सुद्धा आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत होता. त्यावेळी एका रिक्षातून 4 ते 5 तरुण कोयता, तीक्ष्ण हत्यार घेऊन आली  आणि त्याच्यावर हल्ला केला. जीव वाचवण्यासाठी योगेशने घराकडे पळाला पण वाटतेच तो पडला, पाठलाग करत आलेल्या या 4 ते  5 तरुणांनी योगेशवर कोयत्याने सपासप वार केले. यात योगेश जागेवर कोसळला. जखमी अवस्थेत योगेशला जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या