मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /लॉकडाउनमध्ये मॉडेल्सच्या शरीराचे तोडले लचके, धमकावून शूट केल्या ब्लू फिल्म!

लॉकडाउनमध्ये मॉडेल्सच्या शरीराचे तोडले लचके, धमकावून शूट केल्या ब्लू फिल्म!

वेब सीरीजमध्ये काम करण्यास इच्छुक तरूणींना ब्रेक देण्याचे बहाण्याने त्यांची अश्लिल चित्रफिती बनवून त्या प्रसारीत करणाऱ्या पॉर्न फिल्म प्रोडक्शन कंपनीचा पर्दाफाश

वेब सीरीजमध्ये काम करण्यास इच्छुक तरूणींना ब्रेक देण्याचे बहाण्याने त्यांची अश्लिल चित्रफिती बनवून त्या प्रसारीत करणाऱ्या पॉर्न फिल्म प्रोडक्शन कंपनीचा पर्दाफाश

वेब सीरीजमध्ये काम करण्यास इच्छुक तरूणींना ब्रेक देण्याचे बहाण्याने त्यांची अश्लिल चित्रफिती बनवून त्या प्रसारीत करणाऱ्या पॉर्न फिल्म प्रोडक्शन कंपनीचा पर्दाफाश

मुंबई, 07 फेब्रुवारी : कोरोनामुळे (Corona) लागलेल्या लाॅकडाउनने (Lockdown) अनेकांना अक्षरश: रस्त्यावर आणले. याचाच एक भाग माॅडलिंग (modeling career) क्षेत्रात काम करणाऱ्या माॅडेल्सना देखील आर्थिक हलाखीचे दिवस काढावे लागले. मिळेल ते काम करण्याची अशी आशा उराशी बाळगून अनेक मुली रोज मुंबईत काम मिळेल हे स्वप्न पाहून येतात प या मजबूर मुलींच्या माॅडेलच्या शरीराचे अक्षरश: लचके तोडले जात होते. मुंबईत (Mumbai) असाच घृणास्पद प्रकार घडला.

बऱ्याच तरूणींना फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची प्रबळ इच्छा असते. फिल्म इंडस्टी्‌मध्ये नाव कमविण्यासाठी त्या मुंबईमध्ये येतात. फिल्म इंडस्ट्रीमधील काही अपप्रवृत्ती स्वत:च्या फायदयासाठी त्यांचा गैरवापर करून घेतात. सध्या वेबसारीजचे फॅड सुरू आहे. अशाच प्रकारचे वेब सीरीजमध्ये काम करण्यास इच्छुक तरूणींना ब्रेक देण्याचे बहाण्याने त्यांची अश्लिल चित्रफिती बनवून त्या प्रसारीत करणाऱ्या पॉर्न फिल्म प्रोडक्शन कंपनीचा मालमत्ता कक्ष, गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.

धक्कादायक! घरात घुसून केली दोन महिलांची हत्या; तीन मुलं गंभीररित्या जखमी

ॲाडिशन घ्यायच्या बहाणे मुंबईतील एका ठिकाणी बोलवायचे आणि सुरुवातीला किसींग सीन, बॅकलेस सीन आहे एवढंच सांगून थेट रेप सीन किंवा सेक्स सीनचे शुटिंग ही टोळी करायची. माॅडेलने विरोध केला तर संपूर्ण सेटचा आणि शुटिंगचा 10 ते 12 लाख रुपये खर्च दे नाही तर तू आम्हाला फसवलं म्हणून आम्ही पोलिसात तुझी तक्रार दाखल करू, आमची पोलिसांशी सेटिंग आहे. जेलमध्ये खडी फोडायला लावू' अशी धमकी देवून जबरदस्तीने सेक्स सीन शूट करुन ब्लू फिल्म बनवायला तरुणींना ही टोळी भाग पाडायची.

या करता मुंबई उपनगर व इतरत्र बंगले भाडयाने घेवून तेथे पॉर्न साईट व मोबाईल अॅप्लिकेशन्स वरती अपलोड करायचे अश्लिल व्हिडीओज यांचे चित्रीकरण केले जाते. त्यासाठी तरुण व गरजू मुलींच्या असहायतेचा आणि गरीब आर्थिक परिस्थितीचा फायदा घेवून, डायरेक्टर, फायनान्सर, क्रिएटीव्ह मॅनेजर त्यांना धमकावून, जबरदस्तीने पुरूष व स्त्री संभोग करतानाचे विवस्त्र, अर्धनग्न, अश्लिल व बिभत्स चित्रीकरण करून त्यांचे अश्लिल व्हिडीओज तयार करतात. त्यानंतर ते अश्लिल व्हिडीओज विविध वेबसाईट्स व मोबाईल अॅप्स यावर अपलोड करून प्रसारीत करतात.

तसंच हे अश्लिल व्हिडीओ पाहण्यासाठी सबस्क्रिप्शन चार्जेस घेवून गैर मार्गाने लाखो रूपयांची कमाई करतात. त्यासाठी फिल्म प्रोडक्शनच्या बॅनर खाली शॉर्ट फिल्म/वेब सिरीज/टीव्ही सिरीयलमध्ये काम देतो या बहाण्याने मॉडिल्स आणि गरजू महिलांना नाममात्र मोबदला किंवा काही वेळेस काहीही मोबदला न देता त्यांची फसवणूक करतात. सदर अश्लिल व्हिडीओजचे ट्रेलर्स व जाहिराती Instagram, Twitter, Telegram, WhatsAppइत्यादी सोशल मिडीया साईट्स व इंस्टंट मेसेंजर अँप्लीकेशन्स यावरून प्रसारीत करतात.

सरकारने शेतकऱ्यांच्याविरोधात ‘सेलिब्रिटीज्’ना उतरवले, संजय राऊतांचा घणाघात

मालमत्ता कक्षाचे प्र.पो.नि. केदारी पवार यांना त्यांच्या खबऱ्यांमार्फत या सर्व घृणास्पद प्रकारची माहिती मिळाली. त्यानुसार  दुपारी 12 च्या वाजेच्या सुमारास काही व्यक्ती महिला त्यांच्या सहकाऱ्यांसह मढ गांव, मालाड-मालवणी (पश्‍चिम), मुंबई येथील भाड्याने घेतलेल्या बंगल्यामध्ये तरुण स्त्री-पुरुष कलाकारांचे अर्धनग्न, विवस्त्र, अश्लिल व बिभत्स चित्रीकरण करणार आहेत व केलेले चित्रिकरण विविध वेबसाईट्स व अॅप्लीकेशन्स वर प्रसारीत करणार आहेत अशी माहिती पवार यांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीची खातरजमा करुन छापा टाकला असता सदर ठिकाणी लख्ख विद्युत प्रकाश झोतात एक महिला व एक पुरुष पलंगावर अर्ध-नग्न अवस्थेत अश्लिल चाळे करीत असल्याचे व एक महिला मोबाईलवरुन त्याचे शुटिंग करत असल्याचे आढळून आले. शुटिंग करणाऱ्या महिलेला ताब्यात घेवून चौकशी केली असता एक मोबाईल अॅप्लिकेशन असून त्यावर तिने व तिचे सहकाऱ्यांनी शुटिंग केलेले अश्लिल व्हिडीओ अपलोड केले जात असल्याचे तसंच व्हिडीओ पाहण्यासाठी सबस्क्रिप्शन चार्जस आकारले जात असल्याची माहिती उघड झाली. या अॅप सारख्या इतर बऱ्याच वेबसाईट्स व मोबाईल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून देखील अशाच प्रकारे अश्लिल व्हिडीओज प्रसारीत करुन व ते पाहण्यासाठी सबस्क्रिप्शन चार्जेस आकारुन आर्थिक कमाई केली जात असल्याचे व फिल्म इंडस्ट्रीमधील तरूणींची फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे.

जबड्यात धरून खेचत पाण्याबाहेर आणलं; बिबट्यानं मगरीची केली शिकार; पाहा VIDEO

या कारवाई दरम्यान एक महिला (वय ४० वर्षे) व्यवसाय-फोटोग्राफी , एक महिला  (वय ३३ वर्षे) व्यवसाय-ग्राफिक डिझाईनर, एक पुरूष, वय (२८ वर्षे), व्यवसाय - लाईटमॅन व कॅमेरामन, एक पुरूष, (वय २६ वर्षे) व्यवसाय - अभिनेता, एक पुरूष, (२४ वर्ष) व्यवसाय - अभिनेता,

या आरोपींना अटक करुन त्यांना न्यायालयात हजर केले असतात्यांना न्यायालयाने १० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

या यशस्वी कामगिरी बद्दल  मा. मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्‍त (गुन्हे), अपर पोलीस आयुकक्‍त(गुन्हे) मा. विरेश प्रभु यांचे मार्गदर्शनाखाली मा. प्रकाश जाधव, पोलीस उप आयुक्‍त (प्रकटीकरण) व मा. शशांक सांडभोर, सहाय्यक पोलीस आयुक्‍त (डी विशेष) यांनी मालमत्ता कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक केदारी पवार, पो.नि. धिरज कोळी, स.पो.नि. लक्ष्मीकांत साळुंखे, सुनिल माने, अमित भोसले, योगेश खानुरे, म.स.पो.नि. अर्चना पाटील, सोनाली भारते,अरुण सावंत, चिंतामन इरनक, तुषार सावंत, विनोद पद्मन, मंगेश जगझाप, धुळदेव कोळेकर, गायकवाड,  नयना पाटील, रंजना निचिते व सायबर तज्ञ  प्रशांत आसवानी यांचे कौतुक केले आहे.

First published: