Home /News /crime /

छोट्यांच्या भांडणावरून मोठ्यांचा रक्तपात, मुलाच्या वडिलांवर चौघांकडून प्राणघातक हल्ला

छोट्यांच्या भांडणावरून मोठ्यांचा रक्तपात, मुलाच्या वडिलांवर चौघांकडून प्राणघातक हल्ला

खेळताना मुलांमध्ये झालेल्या भांडणाचं (children's fight) पर्यवसान त्यांच्या पालकांच्या हाणामारीत (parent's fight) झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.

    भोपाळ, 23 ऑगस्ट : खेळताना मुलांमध्ये झालेल्या भांडणाचं (children's fight) पर्यवसान त्यांच्या पालकांच्या हाणामारीत (parent's fight) झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. मुलांच्या दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून भांडणं (quarrel and fight) आणि हाणामारी झाली. ही गोष्ट समजल्यानंतर दोन्ही मुलांचे पालक आक्रमक होत एकमेकांसमोल आले आणि त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. अशी घडली घटना भोपाळमधील गोविंदपुरा भागात पंकज सोनी आणि त्यांचं कुटुंब राहतं. पंकज हे एका खासगी कंपनीत काम करतात. त्यांच्या मुलाशी शेजारी राहणाऱ्या एका मुलाचं भांडण झालं. शेजारच्या मुलाने सोनी यांच्या मुलाला मारहाण केली. रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमाराला या गोष्टीची तक्रार करण्यासाठी ते शेजारी गेले. शेजारी भडकले मुलांच्या भांडणाच्या तक्रारी आपल्याकडे का घेऊन येता, असा सवाल करत शेजारील पंचोली कुटुंबातील सदस्यांनी आपल्यावर हल्ला चढवल्याचं सोनी यांनी म्हटलं आहे. तुमच्या मुलाला मारलं तसंच आता तुम्हालाही मारतो, असं म्हणत या कुटुंबातील लोक आपल्या अंगावर धावून आल्याचा दावा सोनी यांनी केली आहे. पंचोली कुटुंबातील एका सदस्याने सोनी यांच्या डोक्यातच तलवार मारली. त्यामुळे सोनी बेशुद्ध झाले आणि जागेवरच कोसळले. त्यांच्या डोक्याला झालेली जखम गंभीर होती. तातडीने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. सध्या सोनी यांच्या तब्येतीला कुठलाही धोका नसल्याची माहिती आहे. पंचोली कुटुंबातील सदस्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. हे वाचा -निशब्द! 5 बहिणींनी भावाच्या मृतदेहाला बांधली राखी; अशी राखीपौर्णिमा कधीच नको छोट्या काऱणावरून मोठी भांडण मुलांमध्ये खेळण्यावरून बऱ्याचदा भांडणं होत असतात. मात्र त्यांच्या भांडणांवरून त्यांच्या पालकांमध्ये झालेल्या रक्तरंजित संघर्षाची चर्चा दिवसभर गोविदंपुरा भागात रंगली होती. आपल्या पालकांचं हे वर्तन पाहून दोन्ही कुटुबांतील मुलांनाही धक्का बसला.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Attack, Bhopal News, Crime

    पुढील बातम्या