भोपाळ, 18 ऑगस्ट : ATM मधील पैसे चोरण्यासाठी
(money theft) स्फोटकं (
explosives) लावून ते उडवून दिल्याची घटना समोर आली आहे. मात्र हा धमाका (
Blast) इतका जबरदस्त होता की चोरट्यांनाही जोरदार कानठळ्या बसल्या. या आवाजाने ते घाबरले आणि चोरी न करताच पळून (
ran away) गेले. हा स्फोट इतका भीषण होता की एटीएम मशीन फुटून त्यातील नोटा उधळल्या गेल्या आणि रस्त्यावर येऊन पडल्या. काही नोटांचे तर तुकडेदेखील झाले.
परिसरात जोरदार आवाज
मध्यप्रदेशातील शिवपुरीमध्ये मंगळवारी रात्री ही घटना घडली. चोरट्यांनी स्फोटकं लावून एटीएम उडवून दिल्याचा आवाज गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी ऐकला आणि तातडीने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत हे चोरटे तिथून पळून गेले होते. या एटीएममध्ये असणाऱ्या नोटा इतस्ततः विखुरलेल्या होत्या.
पोलिसांना मिळाले 6 लाख 72 हजार रुपये
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या एटीएममध्ये जवळपास 7 लाख रुपयांची रोकड होती. स्फोटानंतर या सगळ्या नोटा उधळल्या गेल्या. त्यापैकी पोलिसांनी 6 लाख 72 हजार 500 रुपयांच्या नोटा जमा केल्या असून 28 हजार रुपयांच्या नोटा या स्फोटात फाटल्याचं सांगितलं आहे.
सीसीटीव्हीची मदत
पोलिसांनी एटीएममधील सीसीटीव्ही फुटेज तपासलं असून रात्रीची वेळ असल्यामुळे चोरट्यांचे चेहरे त्यात नीट दिसत नसल्याची माहिती दिली आहे. या परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. एटीएममधून नोटा बाहेर पडण्यापुरता स्फोट करण्याची चोरट्यांची योजना असावी, मात्र त्यांचा स्फोटकांचा अंदाज चुकल्यामुळे मोठा धमाका झाला असावा, असा पोलिसांना अंदाज आहे.
हे वाचा -
मोदी सरकारच्या योजनेच्या नावाखाली महिलांना गंडा; मुंबईत 211 जणींना लुबाडलं
फॉरेन्सिक अहवालाची प्रतिक्षा
या ठिकाणचे नमुने गोळा करण्यात आले असून फॉरेन्सिक चाचणीच्या अहवालानंतर चोरट्यांनी नेमकी कुठली स्फोटके वापरली, हे समजू शकणार आहे. त्यासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आलं असून अधिक तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.