चप्पल घालून मंदिरात गेल्यामुळे तुफान हाणामारी, भाजप आमदार पडळकरांच्या भावावर गुन्हा दाखल

चप्पल घालून मंदिरात गेल्यामुळे तुफान हाणामारी, भाजप आमदार पडळकरांच्या भावावर गुन्हा दाखल

ब्रम्हानंद पडळकर आणि त्यांचे मित्र चपला घालून मंदिरात गेले होते. ही बाब स्थानिक लोकांच्या लक्षात आली.

  • Share this:

सांगली, 18 नोव्हेंबर : कोरोनामुळे गेल्या 8 महिन्यांपासून बंद असलेली मंदिरं अखेर खुले करण्यात आले आहे. मात्र, सांगलीमध्ये चप्पल घालून मंदिरात गेल्याच्या कारणावरून आटपाडी तालुक्यातील मासाळवाडी इथं दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. धक्कादायक म्हणजे, या प्रकरणात भाजपचे (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या भावासह 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आटपाडी तालुक्यातील मासाळवाडी गावात 17 नोव्हेंबर रोजी दुपारी गावातील महालिंगराय मंदिरात ही घटना घडली, असे वृत्त दैनिक महाराष्ट्र टाइम्सने दिले. या प्रकरणी शांताबाई मारुती मासाळ (वय 60) यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली  आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार गोपीचंद पडळकर यांचा भाऊ ब्रम्हानंद पडळकर हे  दुपारी आपल्या मित्रांसह मासाळवाडी येथील मंदिरात दर्शनासाठी गेले होते. मंदिरं सुरू करण्यात आल्यामुळे मंदिराच्या परिसरात साफ-स्वच्छता करण्यात आली होती. पण, ब्रम्हानंद आणि त्यांचे मित्र चपला घालून मंदिरात गेले होते. ही बाब स्थानिक लोकांच्या लक्षात आली.

बदला घेण्यासाठी TV अभिनेत्याची हत्या, पत्नीबरोबर प्रेमसंबंध असल्याचा आरोप

स्थानिकांनी ब्रम्हानंद पडळकर आणि त्यांच्या मित्रांना चपला बाहेर काढून मंदिरात जाण्याची विनंती केली. पण, यावरून दोन्ही गटामुळे वादाला सुरुवात झाली. चपला बाहेर काढण्यावरून दोन्ही गटामध्ये बाचाबाची झाली. काही वेळाने बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले, दोन्ही गटामध्ये रस्त्यावरच तुफान हाणामारी झाली. या धुमश्चक्रीत गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली. त्यामुळे गावात एकच गोंधळ उडाला होता.

या प्रकरणी आटपाडी गावात राहणाऱ्या शांताबाई मारुती मासाळ यांनी आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या घटनेत  मंगळसूत्र आणि मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या गाडीतील 82 हजार लांबवण्याचे या तक्रारीत म्हटले आहे.  त्यांच्या तक्रारीवरून  ब्रह्मानंद पडळकर, गणेश भुते नवनाथ मारुती सरगर, अनिल सूर्यवंशी, विठ्ठल पाटील आणि सत्यजीत पाटील या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारी बंगल्याचे भाडे न भरल्या प्रकरणी राज्यपालांची सुप्रीम कोर्टात धाव

तर या राड्या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात दोन्ही गटाच्या 12 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.आणि यामध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचे भाऊ जिल्हा परिषद सदस्य ब्रह्मानंद पडळकर यांचा समावेश आहे. दरम्यान, ब्रह्मानंद पडळकर यांनी या घटनेशी आपला कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Published by: sachin Salve
First published: November 18, 2020, 12:19 PM IST
Tags: BJP

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading