Home /News /crime /

यापुढे हल्ला कराल तर लक्षात ठेवा...; कर्जतमध्ये हिंदू तरुणावरील हल्ल्यावर नितेश राणेंचा इशारा

यापुढे हल्ला कराल तर लक्षात ठेवा...; कर्जतमध्ये हिंदू तरुणावरील हल्ल्यावर नितेश राणेंचा इशारा

उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था NIA करत आहे. भाजपने कधीही नुपूर शर्मा यांचे सर्मथन केले नाही. मात्र, त्यानंतर कोल्हेंची हत्या करण्यात आली.

    मुंबई, 6 ऑगस्ट : उदयपूरमधील टेलर कन्हैयालालची हत्या होण्याच्या बरोबर एक आठवडापूर्वी अमरावतीमधील उमेश कोल्हे या 54 वर्षांच्या केमिस्टची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणानंतर आता अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतमध्ये एका हिंदू तरुणावर काही मुस्लिम तरुणांनी हल्ला केल्याचा दावा भाजपचे नितेश राणे यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. काय म्हणाले नितेश राणे - उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था NIA करत आहे. भाजपने कधीही नुपूर शर्मा यांचे सर्मथन केले नाही. मात्र, त्यानंतर कोल्हेंची हत्या करण्यात आली. 4 ऑगस्टला पुन्हा एकदा हाच प्रयत्न कर्जत अहमदनगर येथे झाला. प्रतिक पवार या जवानाला 10-12 मुस्लिम तरुणांनी त्याला धमकावले आणि त्याच्यावर हल्ला केला. त्यांच्या हातात कोयते होते. तसेच त्यांनी प्रतीक पवार या तरुणाला सांगितले की, तु नुपूर शर्माचा डिपी ठेवला. आज प्रतिक पवार मृत्यूशी झुंज देतो आहे. त्याला 35 टाके पडले आहेत, असे नितेश राणे म्हणाले. यानंतर आक्रमक होत त्यांनी सांगितले की, डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर देश चालतो. आमचाही हात कोणीही बांधला नाही. त्यामुळे यापुढे हल्ला कराल तर लक्षात ठेवा, असा इशारा त्यांनी केला. तसेच तेथील स्थानिक पोलीस अधिकारी ही केस दाबण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा काही जणांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधल्यानंतर FIR दाखल करण्यात आला, असा दावाही नितेश राणे यांनी केला. हेही वाचा - उमेश कोल्हेच्या हत्येनंतर डिनर पार्टीचं आयोजन; आणखी दोघांना अटक, NIA ला मोठं यश तर काही जण अजूनही फरार आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच संबंधित व्यक्तीवर कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. उमेश कोल्हे हत्या प्रकरण काय? 21 जून रोजी कोल्हे (54) यांची हत्या करण्यात आली होती. भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ फेसबुकवर पोस्ट लिहिण्याविरोधात त्यांची हत्या करण्यात आली. कोल्हे 21 जून रोजी रात्री 10 ते 10.30 दरम्यान त्यांचे 'मेडिकल स्टोर' बंद करून घरी जात असताना हा प्रकार घडला. त्यावेळी संकेत त्याची पत्नी वैष्णवीसोबत दुसऱ्या बाईकवर होता. संकेतनं दिलेल्या तक्रारीनुसार 'मोटारसायकलीवरून आलेल्या दोन जणांनी अचानक माझ्या वडिलांची बाईक अडवली आणि त्यांनी वडिलांची गळ्यावर चाकूनं हल्ला केला. त्यावेळी त्यांच्या गळ्यातून बरंच रक्त वाहात होते. मी माझी गाडी थांबवली आणि मदतीसाठी लोकांना ओरडून विनंती केली. त्यावेळी अन्य एक जण आला आणि त्यासोबत दोन्ही मारेकरी मोटारसायकलीवरून फरार झाले. मी आजूबाजूच्या लोकांच्या मदतीनं वडिलांना हॉस्पिटलमध्ये नेले. हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अमरावती शहर पोलिसांमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार 'अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींनी दिलेल्या कबुलीनुसार त्या सर्वांना आणखी एका आरोपीनं मदत केली होती. त्यानं या आरोपींना पळून जाण्यासाठी एक कार आणि 10,000 रूपये दिले होते.'
    Published by:News18 Desk
    First published:

    पुढील बातम्या