• Home
  • »
  • News
  • »
  • crime
  • »
  • पोलिसांविरोधात अपशब्द वापरणं पडलं महागात; माजी कृषीमंत्र्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल

पोलिसांविरोधात अपशब्द वापरणं पडलं महागात; माजी कृषीमंत्र्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा रद्द झाल्यावर अमरावती शहरातील असंख्य विद्यार्थ्यांनी गाडगेनगर चौकात चक्का जाम करून आंदोलन केलं होतं. या आंदोलनकारी विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला होता.

  • Share this:
अमरावती, 15 मार्च: देशभरातील विद्यार्थी दिवस रात्र जागून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असतात, पण सरकार परीक्षा घेण्यास टाळाटाळ करते. त्यामुळे अशा मेहनती विद्यार्थ्यांना अनेकदा नैराशाचा सामना करावा लागतो. अशी परिस्थिती असताना राज्य सरकारने अचानक पूर्व नियोजित राज्यसेवेच्या परीक्षा रद्द (MPSC Exam Cancel) केल्या होत्या. त्यामुळे राज्यातील विविध ठिकाणच्या विद्यार्थ्यांमध्ये आक्रोश (Student Protests) पाहायला मिळाला. राज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून महाविकास आघाडी सरकारचा (Mahavikas Aghadi Govt) निषेध केला. असेच पडसाद अमरावतीत देखील उमटले होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा रद्द झाल्यावर अमरावती शहरातील असंख्य विद्यार्थ्यांनी गाडगेनगर चौकात चक्का जाम करून आंदोलन केलं होतं. या आंदोलनकारी विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला होता. यामुळे भाजप किसान मोर्चाचे राज्याचे अध्यक्ष आणि माजी कृषिमंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी पोलिसांना अपशब्द वापरले होते. अनिल बोंडे आणि गाडगेनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार आसाराम चोरमले यांच्यात चांगलाच शाब्दिक वाद रंगला होता. याच्या चित्रफिती देखील सोशल मीडियात प्रसारित झाल्या होत्या. माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आसाराम चोरमले यांना 'तुम्ही सरकारचे कुत्रे आहात' असं संबोधलं होतं. यावेळी चोरमले यांनीही बोंडे यांचा उल्लेख 'तुम्ही कुत्रे आहात' असा केला होता. अनिल बोंडे आणि गाडगेनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार आसाराम चोरमले यांच्या बाचाबाचीनंतर पोलिसांनी कारवाई करीत डॉ बोंडे आणि त्यांच्या इतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्यांना समज देवून सोडून देण्यात आलं होतं. हे ही वाचा -VIDEO : एकाच्याही चेहऱ्यावर नव्हता मास्क;कोरोनाच्या कहरात नागपुरात उत्साहात वरात पण घटनेच्या दोन दिवसानंतर भाजप नेते अनिल बोंडे यांच्यासह भाजपच्या पाच पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई राजकीय हेतून केली असल्याचा आरोप लावत या भाजपच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. तसेच गुन्हे मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशाराही भाजपनं दिला आहे. तर दुसरीकडे बोंडे यांनी मात्र ताठर भूमिका घेतली आहे. आपण जे काही बोललो होतो त्या शब्दावर आपण ठाम असं बोंडे यांनी म्हटलं आहे.
Published by:News18 Desk
First published: