मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

'नगरपालिकेच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलाल तर गोळ्या घालू', भर रस्त्यात भाजप नगरसेविकेला धमकी

'नगरपालिकेच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलाल तर गोळ्या घालू', भर रस्त्यात भाजप नगरसेविकेला धमकी

भाजप (BJP) महिला मोर्चाच्या प्रदेश चिटणीस आणि नगरसेविका संध्या देठे (Sandhya Dethe) यांच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

भाजप (BJP) महिला मोर्चाच्या प्रदेश चिटणीस आणि नगरसेविका संध्या देठे (Sandhya Dethe) यांच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

भाजप (BJP) महिला मोर्चाच्या प्रदेश चिटणीस आणि नगरसेविका संध्या देठे (Sandhya Dethe) यांच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

  • Published by:  Chetan Patil
विजय कमळे पाटील, प्रतिनिधी जालना, 22 डिसेंबर : जालन्यात (Jalna) आज भयानक घटना समोर आली आहे. शहरात एका भाजप नगरसेविकेला (BJP Corporater) दोन अज्ञात इसमांनी रस्त्यात अडवत जीवे मारण्याची धमकी (Death threat) दिली आहे. त्यामुळे संबंधित परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं. ही धमकी नेमकी कुणी दिली ती माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पण पोलिसांनी (Police) या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. भर दिवसा एका नगरसेविकेला रस्त्यात अडवून गोळ्या झाडून जीवे मारण्याची धमकी कशी दिली जाऊ शकते? असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जातोय. त्यामुळे आरोपींना पोलिसांचं अजिबात भय राहिलेलं नाही हे यातून स्पष्टपणे समोर येतंय. नेमकं प्रकरण काय? भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश चिटणीस आणि नगरसेविका संध्या देठे यांच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. संध्या देठे या बुधवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पत्रकार परिषद आटोपून घरी निघाल्या होत्या. यावेळी त्यांना इन्कम टॅक्स कॉलनीतील घोगरे स्टेडियमजवळ दोन अज्ञात इसमांनी अडवले. आरोपींनी संध्या यांना जीवे मारण्याची धमकी दिली. "नगरपालिकेच्या भ्रष्टाचाराबद्दल बोललात किंवा तक्रार केली तर तुम्हाला बंदुकीतून गोळ्या घालून मारुन टाकू", अशी धमकी आरोपींनी संध्या यांना दिली. त्यानंतर आरोपी फरार झाले. हेही वाचा : पहिला दिवस गाजवला, आता पुढे काय? रणनीती आखण्यासाठी भाजपची मुंबईत डिनर डिप्लोमेसी आरोपींचा शोध सुरु संध्या देठे यांनी संबंधित घटनेची माहिती तातडीने आपले पती संजय देठे यांच्यासह पक्षाच्या इतर कार्यकर्त्यांना दिली. संध्या यांचे पती संजय देठे यांनी वेळ न दडवता तातडीने कदीम जालना पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिथे त्यांनी पोलिसांना सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने या प्रकरणाची दखल घेतली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. लवकरच आरोपींनी बेड्या ठोकल्या जातील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
First published:

पुढील बातम्या