Home /News /crime /

कोल्हापूर हादरलं, भाजप नगरसेविकेच्या पतीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला

कोल्हापूर हादरलं, भाजप नगरसेविकेच्या पतीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला

विनायक हुक्किरे हे रात्री हॉटेल रविराजमध्ये जेवणासाठी गेले होते. हॉटेलमध्ये जेवन घेत असताना अचानक 3 ते 4 अज्ञात हल्लेखोरांनी कोयते, चाकूने हल्ला केला.

    कोल्हापूर, 08 नोव्हेंबर : कोल्हापूर (Kolhapur)जिल्ह्यातील इचलकरंजीमध्ये (Ichalkaranji)भाजप नगरसेवकांच्या पतीवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात विनायक हुक्किरे (Vinayak Hukkire)हे गंभीर जखमी झाले आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, भाजप  नगरसेविका नेहा हुक्किरे यांचे पती विनायक हुक्किरे यांच्यावर शनिवारी रात्री चाकू, कोयत्याने हल्ला करण्यात आला. विनायक हुक्किरे हे रात्री उशिरा इचलकरंजी-कोल्हापूर रोडवरील हॉटेल रविराजमध्ये जेवणासाठी गेले होते. हॉटेलमध्ये जेवन घेत असताना अचानक तीन ते चार अज्ञात हल्लेखोरांनी कोयते, चाकूने  हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे हॉटेलमध्ये एकच गोंधळ उडाला. कोयत्याचा वार वर्मी बसल्यामुळे विनायक हुक्किरे जागेवर कोसळले. खोल दरीत लटकण्याचा आनंद घेण्यासाठी या हॉटेलला जातात लोकं, थरकाप उडवणारे PHOTO विनायक हुक्किरे रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले होते, त्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. जखमी अवस्थेत  विनायक हुक्किरे यांना तातडीने इचलकरंजीच्या आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, प्रकृती गंभीर असल्यामुळे सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रविराज हॉटेलमध्ये जाऊन पाहणी केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात असून आरोपींची शोध सुरू आहे. मंदिरं का उघडणार नाही? मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच दिले स्पष्टीकरण विनायक हुक्किरे यांचा काही दिवसांपूर्वी एका गटासोबत वाद झाला होता. या वादातून हा हल्ला झाला असावा, असा संशय  पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरा एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या